IPL 2020 | KXIP v RCB अकोल्याचा दर्शन नळकांडेचे स्वप्न होणार साकार…आज किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळण्याची शक्यता !…

न्यूज डेस्क – IPL च्या १३ व्या सीजनचा सहावा सामना आज संध्याकाळी दुबईमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब (केएक्सआयपी) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) यांच्यात खेळला जाईल.या सामन्यात अकोल्याच्या दर्शन नळकांडे या क्रिकेट पटू ला किंग्ज इलेव्हन पंजाब कडून आज खेळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

किंग्ज इलेव्हन पंजाबचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सोबत आहे. या सामन्यापूर्वी संघाचा अष्टपैलू ख्रिस मॉरिसच्या खेळाविषयी शंका असल्याने त्याच्या जागी अष्टपैलू अकोल्याचा सुपुत्र दर्शन नळकांडे याला संधी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दर्शन हा २०१९ च्या हंगामात तो कोणताही खेळ खेळला नाही परंतु २०२० आयपीएलच्या लिलावापूर्वी केएक्सआयपीने त्याला कायम ठेवले. विदर्भाला महाराष्ट्रावर अशक्य विजय मिळवून देण्यासाठी विजय हजारे ट्रॉफी मध्ये जोरदार कामगिरी केली होती.

अकोला उमरी येथे राहणाऱ्या दर्शन नळकांडे चा (जन्म: ४ ऑक्टोबर १९९८) हा एक भारतीय क्रिकेटपटू आहे. त्याने २ ऑक्टोबर २०१८ रोजी २०१८ – १९ विजय हजारे ट्रॉफीमध्ये विदर्भासाठी आपली यादी प्रथम पदार्पण केले. १ नोव्हेंबर २०१८ रोजी रणजी करंडक स्पर्धेत त्यांनी विदर्भासाठी प्रथम श्रेणी प्रवेश केला.डिसेंबर २०१८ मध्ये, त्याला किंग्ज इलेव्हन पंजाबने २०१९ च्या इंडियन प्रीमियर लीगच्या प्लेयर लिलावात खरेदी केले होते. २१ फेब्रुवारी २०१९ रोजी त्याने सय्यद मुश्ताक अली करंडक २०१८ – १९ मध्ये विदर्भाकडून ट्वेंटी -२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

किंग्ज इलेव्हन पंजाब कडून यातील अंतिम अकरा खेळाडूंची होणार निवड

केएल राहुल (सी) (डब्ल्यू), अर्शदीप सिंग, ख्रिस गेल, दर्शन नलकांडे,कृष्णाप्पा गौथम ,हार्डस विल्जॉईन ,हरप्रीत ब्रार ,जगदीश सुचित, करुण नायर ,मंदीप सिंग ,मयंक अग्रवाल ,मोहम्मद शमी ,मुजीब उर रहमान ,मुरुगन अश्विन ,निकोलस पूरण ,सरफराज खान ,ग्लेन मॅक्सवेल ,शेल्टन कॉटल ,ईशान पोरेल ,रवी बिश्नोई ,जिमी नीशम ख्रिस जॉर्डन, तजिंदरसिंग ,सिमरन सिंग


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here