पूजा चव्हाण प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करा; मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची बंजारा समाजातील महिलांची मागणी…

यवतमाळ – सचिन येवले

पंधरा दिवस होऊनही पूजा चव्हाणची आत्महत्या की, हत्या हे स्पष्ट झाले नाही. या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी आणि मुख्यमंत्र्यांनी आरोप असलेल्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी बंजारा समाजातील महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

आरोप असलेल्या मंत्र्यांनी पोहरादेवी येथे जाऊन पूजा चव्हाण बद्दल एकही शब्द काढला नाही. या घटनेतील सत्य अजूनही पडद्यामागे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा घेऊन सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here