जातीय अत्याचारांच्या गुन्ह्याची चौकशी करा…मूर्तिजापूर वंचित आघाडीच्या वतीने दिले निवेदन…

मूर्तिजापूर – वंचित बहुजन आघाडी मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी यांना निवेदने देऊन या हल्ल्यांचा निषेध करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी विचारसरणीचे राज्य आहे अशी देशात वदंता आहे. शिवाजी-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या कार्याचा व विचारांचा ठसा या राज्यातील तमाम जनतेवर आहे.

असे असतांनाही या दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत राज्यात ज्या जातीय अत्याचाराच्या घटना घडल्या त्यामुळे महाराष्ट्राची शान मात्र धुळीस मिळविल्या गेली. त्यातील काही घटना येणेप्रमाणे:-

कोरोना काळात सबंध जग बंदिस्त असतांना राज्यातील जातीयवाद उफाळून आलाय. अशा अनेक अत्याचाराच्या घटना राज्यात या दोन महिन्यात घडलेल्या आहेत. या सर्व घटनांच्या बाबतीत ठोस कारवाई पोलिसांकडून झालेली नाही.

यामध्ये स्थानिक सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा गुन्हेगारांना मिळतो आहे. तसेच त्या-त्या भागातील मंत्री, पालकमंत्री व स्थानिक आमदार निष्क्रिय दिसून येताय.

राज्याच्या गृहमंत्र्यांचा त्यांच्यावर वचकच राहिलेला दिसत नाही. उलटपक्षी गृहमंत्री यांच्या पक्षाचा कार्यकर्ता व जवळची व्यक्तीच नागपूरच्या बनसोडे हत्या प्रकरणात मुख्य आरोपी आहे म्हणून त्यास वाचविण्याचा प्रयत्न होतोय.

महाराष्ट्राच्या विविध भागात वरील जातीय अत्याचाराचे गुन्हे घडलेले आहेत. हे जातीय गुन्हे मुद्दाम घडवून आणीत आहेत असाच दाट संशय येतोय.
सरकारच्यावतीने वरील सर्व प्रकरणात काय व कोणती कारवाई केली,

तसेच कारवाई कधी झाली याबाबत मा. मुख्यमंत्री महोदयांनी माहिती द्यावी अशी आम्ही मागणी करीत प्रकरणात लवकरात लवकर निपक्षपणे कारवाई होईल ही अपेक्षा करीत संजय नाईक ता अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी , माया ताई नाईक जिल्हा परिषद सदस्य मोहन वसुकार योगिता वानखडे , अतुल नवघरे , तस्सवर खान शहर अध्यक्ष , अक्षय आटोटे , गौतम कांबळे , नकुल काटे, सचिन गजबे,सदरचे निवेदन दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here