नागपूर – शरद नागदेवे
नागपुरात आतंरराज्यीय सेक्स रॅकेट चालविण्यासाठी अमरावती रोडवरील भरत नगरातील पुराणिक ले-आऊट स्वामी संकेत अपार्टमेंट येथील तीसऱ्या माळ्यावर फ्लॅट कीरायाणी घेतला होता.त्याठिकाणी ते फरिदाबाद येथील मुलींना पैशाचे लालच दाखवून देहव्यापार करणाऱ्यासाठी नागपुरात आणत होते.
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी माहिती कळताच त्यांनी बोगस ग्राहक पाठवून सौदा पक्का केला.आर्थीक व्यवहार झाल्यानंतर बोगस ग्राहकाने ईशारा करताच पोलीसांनी धाड टाकली.याप्रकरणी पोलीसांनी आरोपी कुष्णकूमार देशराज वर्मा(वय २४ रा.शिवनगर ,जिल्हा हिसार , हरियाणा, मोहम्मद मोबीन मोहम्मद खाजा अली (वय २५ रा.राजेन्द्र नगर , जिल्हा रंगारेड्डी तेलंगणा) दोघांना ताब्यात घेतले.
संबधित आरोपी सेक्स ब्रोकर असल्याची समोर आली आहे.या दोघांचे दिल्ली, हरियाणा येथे मोठे नेटवर्क असून अनेक मुलिंना पैश्याचे आमिष दाखवून त्यांना या व्यवसायात आणल्याचे समोर आले आहे.आरोपिंचा ताब्यातून ४२हजार रूपयांचे ५ मोबाईल हॅंडसेट,५ लाखांची टाळ्या रंगाची हुडंई कंपनीची कार बोगस ग्राहकाकडून स्विकारलेले ७ हजार रुपये असा एकूण ५ लाख ४२ हजार ५०० मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तीन मुलिंची सुटका करण्यात आली.पोलीसांनी आरोपींविरुद्ध अंबाझरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.ही कारवाही अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) सुनील फुलारी यांच्या निर्देशान्वये पोलीस उपायुक्त (डीटेक्शन) गजानन राजमाने ,
साहाय्य पोलीस आयुक्त (गुन्हे) सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या सह महिला पोलीस उपनिरीक्षक मंगला हरडे, पोलीस हवालदार अनिल अंबादे,नायक पोलिस शिपाई राशिद शेख यांनी कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.