जागतिक महिला दिन सोहळा २०२१…

रामटेक – राजु कापसे

जागतिक महिला दिनानिमित्त तनिष्का व्यासपीठ शितलवाडी तर्फे ८ मार्च २०२१ ला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजनात शितलवाडी येथील आदर्श बचत गट , अंगणवाडी सेविका व आशा वर्कर कार्यक्रमाच्या आयोजनात सहभागी होत्या.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्रीमती शकुंतला गायकवाड, प्रमुख उपस्थिती व वक्ते म्हणून श्री राजेश राठोड समता दूत बार्टी, पुणे, अंगणवाडी सेविका अनुपमा बिसने, आदर्श बचत गटाच्या सदस्य नंदा भिवगडे,आशा सेविका पुष्पा ठाकरे उपस्थित होत्या.

सर्वप्रथम राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट समन्वयक योगिता गायकवाड यांनी केले. समतादूत राठोड सर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.

सद्यस्थितीत असलेले कोरोनाचे संकट बघता कार्यक्रम अतिशय कमी उपस्थित ठेवून कोरोना संबंधित नियमांचे पालन करून जागतिक महिला दिन सोहळा साजरा करण्यात आला.परंतु कार्यक्रमावर अवाजवी खर्च न करता तोच खर्च एखाद्या महिलेला आत्मनिर्भर बनविण्यासाठी उपयोगात आणावा,असा संकल्प महिला दिनाच्या निमित्ताने घेण्यात आला.

यावेळी कोरोना काळात पतीचे निधन झालेल्या माधुरी डायरे यांना तनिष्का यांच्याकडून शिवणकाम प्रशिक्षण देण्याचे जाहीर केले. तसेच प्रत्येक महिलेला भेटवस्तू देण्यात आली.घेतलेल्या खेळामध्ये विजेत्या ठरलेल्या लता क्षिरसागर व पुष्पा ठाकरे यांना बक्षिस देण्यात आले.

स्नेहा खांडेकर यांचे विशेष सहकार्य कार्यक्रमासाठी मिळाले.दिपा चव्हाण, शबाना शेख,रेषा सलामे, अश्विनी भोपते, अनिता आकरे, कल्यानी मारबते, अर्चना वाडीभस्मे, चित्रा वानखेडे, सोनिया देशमुख, निशा तिवारी, शशिकला सलामे, रसिका आफतवार, मंगला रहाटे, शुभा थुलकर ,अनुश्री मॅडम यांची उपस्थिती होती. आनंदाचा क्षण असल्याचा अनुभव हा प्रत्येक महिलेच्या हास्यातून येत होता. कार्यक्रमाचे संचालन रजनी वांढरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार ममता बनसोड यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here