आयुषी उके, या तरुणीने इंटरनॅशनल मॅथेमॅटिक ऑलिम्पियाड स्पर्धेत मिळविला जगात तिसरा तर आशिया खंडात पहिला क्रमांक…

दिव्यांग असताना सुद्धा जागतिक पातळीवर मिळविला यश…

गोंदिया – अमरदिप बडगे

गोंदिया शहराच्या कुंभारे नगर भागात राहणाऱ्या १५ वर्षीय आयुषी उके,या तरुणीने जागतिक पातळीवर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल मॅथेमॅटिक स्पर्धेत जगात तिसरा तर आशिया खंडात पहिला क्रमांक पटकाविला असून हि परीक्षा ऑक्टोम्बर २०२० मध्ये घेण्यात आली असून ६ ऑक्टोम्बर २०२१, ला या स्पर्धेचा निकाल ऑनलाईन निकाल पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे.

हि आहे आयुषी उके, गोंदियाच्या गुजराती शाळेत ९ व्या वर्गात शिक्षण घेत असेलली तरुणी आयुषीला लहानपणा पासूनच गणित विषयाची आवड असून कितीही मोठा गणित असो ती त्याच्याशी खेळ्यासारखी सहज सोडवू शकते तर इतकेच नाही तर ती इतर वर्ग मित्रांच्या मनात देखील गणित विषयाची असलेली भीती दूर करायला मदत करते तिच्या अभ्यास खोलीत सर्वत्र गणिताचे फॉर्म्युला चिकटविलेले आहेत.

आयुषीला वर्ष २०२० मध्ये इंटरन्याशनल मेथेमेटिक ओलम्पियड परीक्षेची विषयी माहिती मिळाली असता तिने तिचे गणित विषयाचे वर्ग शिक्षक अलीम सय्यद,यांच्या मदतीने IMO कडे ९ व्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या गटातून ऑनलाईन नामांकन केला आणि ऑक्टोबर २०२० मध्ये ऑनलाईन परीक्षा दिली असून ६० मिनिटाची हि ऑनलाईन परीक्षा असून ६० मार्क देखील यात होते.

त्यात ५८ मिनिटात आयुषीने हे ६० हि गणित ऑनलाईन पद्धतीने सोडविले असून नुकतंच ६ ऑक्टोम्बर २०२१ ला या परीक्षेचा निकाल आला असून आयुषीने जगात तिसरा तर आशिया खंडात पहिला क्रमानं पटकाविला असून आयुषीला भविष्यात क्लेकटर व्हावंचा आहे यासाठी ती आतापासूनच तयारी करीत आहे तर आयुषीची आई हि देखील उच्च शिक्षित असून ती आयुषीला मदत करते मात्र मुलगी जिल्हा पातळीवर किंवा राज्य पातळीवर प्रथम येईल असे आयुषीच्या आईला वाटत होते.

मात्र आयुषीच्या परीक्षेचा निकाल आल्यावर आई वर्षा उके हिच्या डोळ्या बोलताना देखील आनंद अश्रू कोसळले तर आयुषी हि दिव्यांग असून सुद्धा तिच्या वडिलांनी शिक्षणाप्रति असलेली चिकाटी पाहता तिला शिक्षणा करिता ज्या काही पुस्तका लागतत ते अजय हे वेळेवर घेऊन देत असून आयुषीने या पुस्तकांचे तिने चीज करून दाखविल्याचे ते सांगतात.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here