पातूर – निशांत गवई
शहरातील महात्मा फुले कला व विज्ञान या शैक्षणिक संस्थेच्या संस्था चालक एका विनयभंगाच्या प्रकरणात एका महीला कर्मचार्यानी तक्रार केली असुन या मध्ये आरोप असलेल्या संस्था चालकाने पत्रकार दिनाचे औचित्य साधुन संस्थेत कार्यक्रम घेवुन त्या मध्ये पातूरचे ठाणेदार व तहसिलदार यांचा सत्कार करण्यात आला,
या बाबत वृत्त प्रसिध्द झाल्या नंतर वरिष्ठ अधिकार्या कडुन याची दखल घेण्यात आली असुन या बाबत आपले म्हणणे सादर करण्याचे निर्देश अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक यानी दिले असल्याची माहीती आहे.
पातूर येथील एका महात्मा फुले कला विज्ञान महाविद्यालयाचे संस्थापक संस्था अध्यक्ष सुभाष बोचरे यांच्या विरोधात या संस्थेच्या एका महीला कर्मचार्यानी विनयभंगाची तक्रार दिली असुन या प्रकरणात आरोप असलेले संस्थापक संस्था अध्यक्ष सुभाष बोचरे यांनी पत्रकार दिनाचे औचित्य साधुन महाविद्यालयात एक कार्यक्रम आयोजीत केला होता.
या मध्ये चक्क विनयभंगाचे आरोप असलेल्या संस्थापर संस्था अध्यक्ष सुभाष बोचरे यांनी ठाणेदार हरिश गवळी व तहसिलदार दिपक बाजड याचा सत्कार केला या प्रकरणाचे वृत्त प्रकाशीत करण्यात आल्या नंतर अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी पातूरचे ठाणेदार यांना आपले म्हणणे सादर करण्याचे निर्देश दिल्याने या प्रकरणाची वरिष्ठ अधिकार्या कडुन दखल घेण्यात आली असल्याची माहीती आहे.