गणेश तळेकर
महाराष्ट्राचा मानबिंदू असणार्या, शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने ख्यातनाम इतिहास अभ्यासक ,लेखक व प्रेरणादायी वक्ता साताऱ्याचे प्रा.नितीन बानुगडे पाटील यांचे लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवराय हे व्याख्यान दि १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११वाजता ग्रंथालयाच्या दादर पूर्व येथील शारदा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे उपाध्यक्ष डॉ भालचंद्र मुणगेकर भूषवणार आहेत! वर्तमानात एकूणच जी सामाजिक व राजकीय परिस्थिती आहे, त्यात सर्वसामान्यांचे जनहित बाजूला पडत आहे, ते पाहून निराश न होता जनमन सक्षम करणे ही आजची निकड आहे! जनतेचे रक्षक,पालनकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवनीती महत्त्वपूर्ण वाटते आणि म्हणूनच राज्यकर्ते कसे असावे,
याचा आदर्श असणारा आमचा राजा छत्रपती शिवराय यांना मानवंदना देणारे प्रा नितीन बानुगडे पाटील याचे व्याख्यान मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीने आयोजित करण्यात आल्याचे कार्याध्यक्ष शीतल करदेकर यांनी सांगितले! प्रा नितीन बानुगडे पाटील यांचे व्याख्यान तरुणाईला जास्त भावेल, कोरोनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम होणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असून , हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत आहे अशी माहिती प्रमुख कार्यवाह रविंद्र गावडे यांनी दिली