कोगनोळीत तालुका पंचायत कार्यनिर्वाहक मल्लिकार्जुन वुळागडी यांच्याकडून उद्योग खत्री योजनेतील कामांची पाहणी…

राहुल मेस्त्री

कोगनोळी तालुका निपाणी येथील ग्रामपंचायत मार्फत विविध भागामध्ये विकास कामे केलेल्या उद्योग खत्री योजनेतील कामांची दिनांक 29 रोजी पाहणी निपाणी तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी मल्लिकार्जुन वुळागडी यांनी केली. यावेळी त्यांनी कोगनोळीतील ढेपण पानंद,जाधव-तेली पानंद आणि गणेश नगर येथील पानंद रस्त्यांची पाहणी मल्लिकार्जुन वुळागडी यांनी केली.

त्याचबरोबर येणाऱ्या काळात होणारी विकास कामे योग्य पद्धतीने करण्याच्या सुचना याठिकाणी दिल्या.ही पाहणी केल्यानंतर समाधान व्यक्त केल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य तात्यासो कागले यांनी दिली.त्यांनी उद्योग खत्री या योजनेत आनखी जादा कोणकोणती कामे करता येतात आशा कामांची माहिती दिली.असुन शासनाच्या अन्य काही योजनेची माहिती देखील देण्यात आली त्यांच्या समवेत सहाय्यक अभियंता कोतवाल उपस्थित होते.

यावेळी ग्रामपंचायत पीडीओ जाधव,अकाऊंट पी डी चावर,आप्पासाहेब खोय,ग्रामपंचायत उपाध्यक्ष तुकाराम शिंदे,ग्रा.पं.सदस्य कृष्णात खोत,ग्रा.पं.सुनील माने,संजय खोत,शर्मिला हळीज्वाळे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here