कोगनोळी – राहुल मेस्त्री
कोगनोळी ता.निपाणी येथील पुणे बंगळूर महामार्ग क्रमांक चारवरील कोगनोळी टोल नाक्याला बगल देऊन शेकडो वाहने कोगनोळी गावातुन जात असतात.यासाठी निपाणी पोलीस अंतर्गत असणाऱ्या हायवे पेट्रोलिंक पोलीसांमार्फत कोगनोळी ता.निपाणी येथे महामार्गावरील टोलला बगल देऊन जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.
यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स ,आरसी बुक आणि इन्शुरन्सची कागदपत्रे तपासली जात आहेत.त्याच बरोबर चार चाकी व दुचाकी वाहनावरून विना मास्क जाणाऱ्या लोकांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती ए एस आय टोलगी यांनी दिली.यावेळी कॉन्स्टेबल आर टी आणि कॉन्स्टेबल ए आय यशवंत उपस्थित होते.