तेलंगणाच्या चेक पोस्टवर महाराष्ट्रातुन जाणाऱ्या गाड्यांची तपासणी; कोरोनाचा वाढता प्रदुर्भावच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रवाशांची तपासनी…

बिलोली – रत्नाकर जाधव

महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रदुर्भावच्या अनुषंगाने तेलंगनाच्याआर.टी.ओ. चेक पोष्टवर महाराष्ट्रातून जाणाऱ्या गाड्यांची व प्रवाशांची तपासणी केली जात असून खबरदारीचा उपाय म्हणून तेलंगणा सरकार कडून ही मोहीम राबवली जात असतांना महाराष्ट्राच्या चेकपोष्ट प्रशासनाच्या वतीने तपासणी मोहीम राबवित नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना जिल्ह्यात ही कोरोनाचा चा मोठा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व उपाय केले जात आहेत.महाराष्ट्रात वाढत आसलेल्या कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून शेजारच्या तेलंगणा राज्याने महाराष्ट्रातुन तेलंगणात जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची व त्यातील प्रवाशांची ही कोरोना लक्षणांची तपासणी केली जात.

दोन्ही राज्याच्या सीमेवर तेलंगणाच्या बोधन तालुक्यातील सालुरा येथील चेकपोष्टवर ही कारवाई तेलंगणा सरकारने चालू केली आहे.सालुरा येथील चेकपोष्टवर तेलंगणात खबरदारीचे उपाय म्हणून या प्रक्रिया करत असतांना महाराष्ट्रा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव साठी कुठल्याही ठोस उपाय केला जात नाही.तेलंगणातून येणाऱ्या वाहनांची व प्रवाशांची तपासणी केली जात नाही.कोरोनाचा सध्याचा वाढत प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर तेलंगणातून येणाऱ्या वाहनांची व प्रवाशांची तपासणी करावी अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here