स्मार्ट व्हिलेज मावलगावची लातूर जिल्हा परिषद च्या सभापती कडून पाहणी…

अहमदपूर – बालाजी तोरणे

अहमदपूर पासून जवळच असलेल्या मौजे मावलगाव या गावास आदर्श गाव म्हणून अनेक पारितोषिके मिळाली असल्याने मावलगाव गावाची स्मार्ट व्हिलेज म्हणुन ओळख निर्माण झाल्यावरून लातूर जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती गोविंदराव चिलगुरे व समाजकल्याण सभापती रोहीदासराव वाघमारे यांनी नुकतीच संयुक्त पाहणी केली आहे. ‌‌

तालुक्यातील मौजे तेलगाव येथील काही विशिष्ट नवीन जातिच्या पशुधनाची व वृक्षांची पाहणी करून शेतकऱ्यांना बायोगॅस संचाचे महत्त्व सांगुन अनेक शेतकऱ्यांना बायोगॅस बसवण्यासाठी प्रोत्साहण दिले. त्यांनंतर मावलगाव येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात सार्वजनिक स्वरुपात राबविण्यात आलेल्या कडबाकुटी यंत्र, गावकऱ्यांना फोफत दळणाची सौर ऊर्जेवरची मशीन, संपूर्ण गावकऱ्यांना स्नान करण्यासाठी गरम पाण्याची सौर ऊर्जेवरची व्यवस्था,

गावातील महिलांना एकत्रित पणे कपडे धुण्यासाठी धोबीघाट ‌अशा अनेक कामांची पाहणी लातूर जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती गोविंदराव चिलगुरे व समाजकल्याण सभापती रोहीदासराव वाघमारे यांनी करून मावलगाव ग्रामपंचायतीचे व ग्रामस्थांचे कौतुक केले. ‌

यावेळी लातूर जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुभाष पोले , उपविभागीय कृषी अधिकारी महेशकुमार तिर्थकर , तालुका कृषी अधिकारी बी.बी.तोर , पंचायत समितीचे कृषी अधिकारी जाधव , जिल्हा परिषदेचे स्वीकृत सदस्य नंदकुमार कोणाले, राजकुमार खंदाडे, गोविंदराव गिरी, राजकुमार ‌सोलनकर,

ग्रामविकास अधिकारी राजेंद्र कांबळे,उतम भदाडे , अशोक सोळुंके, राजकुमार कांडणगिरे, नागनाथ माने , संतोष कल्याणे हे उपस्थित होते.यावेळी मावलगावचे सरपंच गणपतराव‌ संपते ,शरद पाटील , रामचंद्र केंद्रे यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here