“बांधकाम” कडून मिरज-मालगांव रस्त्याची पाहणी मनपाच्या सहकार्याने हद्द निश्चित करणार…संतोष रोकडे

सुधार समितीच्या आंदोलनाची घेतली दखल

सांगली प्रतिनिधी :– ज्योती मोरे.

मिरज-मालगांव रोड अतिक्रमणमुक्त करून रूंदीकरण्यासाठी मिरज शहर सुधार समितीने केलेल्या आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे यांच्या पथकाने मिरज-मालगाव रस्त्याची पाहणी केली. यावेळी मिरज सुधार समितीचे सदस्य उपस्थित होते.

या रस्त्यावरून मिरज पूर्व भागासह कर्नाटकला जाणाऱ्या वाहनधारकांची संख्या मोठी आहे. सुभाषनगर पर्यंत रस्ता महापालिका क्षेत्रात असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूस सुमारे 40 हजारहून अधिक लोकसंख्या असलेले उपनगरे आहेत.

या रस्त्याशेजारील नैसर्गिक नाला मुजवून अनेकांनी अतिक्रमण करून घरे बांधले आहेत. वाळू, भंगार, लोखंड विक्रीचे दुकाने थाटली आहेत. रस्ता अरुंद झाल्याने दररोज अपघात घडत आहेत. याबाबत मिरज शहर सुधार समिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करत आहे. अधिकारी केवळ वेळ मारून नेत असल्याने गुरूवारी मिरज शहर सुधार समितीच्या क
कार्यकर्त्यांनी बांधकाम विभागात ठिय्या आंदोलन केले होते. याची दखल घेत शुक्रवारी कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, शाखा अभियंता पवार, अबूबकर शेख यांच्या पथकाने मिरज-मालगाव रस्त्याची पाहणी केली.

यावेळी समितीचे अ‍ॅड. ए. ए. काझी, अध्यक्ष शंकर परदेशी, उपाध्यक्ष अफजल बुजरूक, युवा अध्यक्ष मुस्तफा रोहिले, शकील पिरजादे, असिफ निपाणीकर, अनिकेत माने, संतोष जेडगे, सलीम खतीब, जहीर मुजावर, रफिक पिरजादे आदी सदस्य उपस्थित होते. श्री. रोकडे यांनी रस्ता शेजारील रहिवाश्यांशी संवाद साधला. यावेळी संतोष रोकडे म्हणाले, महापालिका क्षेत्रातील दिंडी वेस ते सुभाष नगर हा तीन किमीचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचा रस्ता आहे. रस्ता शेजारी तात्पुरते अतिक्रमण असल्याने ते सहज काढणे शक्य आहे. महापालिकेच्या सहकार्याने विकास आराखडा प्रमाणे रस्ता हद्द निश्चित करून चारपदरी रस्त्याचा अंदाजपत्रक तयार करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here