बिलोली तालुक्यात ४१४ शिक्षकांची तपासणी; दोघांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह…

बिलोली – रत्नाकर जाधव

तालुक्यात शाळा सुरु करण्याच्या आधी ४१४ शिक्षकांची कोविड तपासणी झाली असून दोन शिक्षकांचे अहवाल पोझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गणपत वाडेकर यांनी दिली आहे.

तर जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता सामाजिकअंतरासह,मास्कचा वापर करून सुरक्षित राहण्याचे आव्हान वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागेश लखमवार यांनी अवाहन केले आहे.

राज्यशासनाने २३ नोव्हेंबर पासून नववी ते बारावी पर्यन्तच्या शाळा सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.परंतु तत्पूर्वी सर्व शिक्षकांची कोरोनाची चाचणी करणे अनिवार्य केले आहे.त्या अनुषंगाने बिलोली तालुक्यात एकूण ४१४ शिक्षकांची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणपत वाडेकर यांनी दिली आहे.

आत्ता पर्यन्त झालेल्या ४१४ शिक्षकांच्या तपासणीत तालुक्यातील सागरोळी येथील संस्थेच्या एका व कोल्हेबोरगाव येथील एका शिक्षकांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वाडेकर यांनी दिली आहे.

जिल्ह्यात सध्या पुन्हा कोरोनाची रुग्ण वाढत असल्यामुळे आधीच संभ्रमात असलेल्या पालकांची शिक्षकांच्या रेपोर्टकडे लक्ष आहे.त्यात तालुक्यात दोन शिक्षक पॉझिटिव्ह आल्यामुळे पालकां- कडून संमती देण्याच्या बाबतीत संभ्रम निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात पुन्हा कोरोणाचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी स्वतःची व कुटूंबाची काळजी घ्यावी व नियमित मास्क वापरणे, साबणाने हात धुणे व सामाजिक अंतर राखावे असे आव्हान ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.नागेश लखमावार यांनी केले आहे.सध्या बिलोलीचे कोविड सेंटर मध्ये ४ रुग्ण उपचार घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here