स्वस्त धान्य दुकानामधून मिळणाऱ्या खराब धान्याची चौकशी करून संबंधितावर कारवाई करा…

भारतीय जनता पार्टी,आदिवासी आघाडी तर्फे उपविभागीय अधिकारी,रामटेक यांना निवेदन…

देवलापार – पुरुषोत्तम डडमल

आज बुधवार दि २०ऑक्टोबर ला दुपारी १२:३० वाजताच्या दरम्यान भाजपा आदिवासी आघाडीचे जिल्हा महामंत्री ज्ञानेश्वर ढोक यांचा मार्गदर्शनात रामटेकचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.रामटेक तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानामधून गोरगरिबांना तांदूळ,गहू वाटप करण्यात येतो.परंतू मागील काही महिन्यापासून खराब धान्य स्वस्त धान्य दुकानदारांना पुरवठा होत आहे.

त्या धान्या मध्ये विविध प्रकारच्या जीव जंतूंची विष्टा,माती, खडे,रेती असून ते माणसाच्या जीवनाला हानिकारक असून याला जे अधिकारी जवाबदार आहेत त्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी प्रामुख्याने नगराध्यक्ष दिलीप देशमुख,जिल्हा परिषद सदस्य सतिश डोंगरे,देवलापार मंडळ अध्यक्ष लक्ष्मण केने,बालचद बादुले,नगरपरिषद उपाध्यक्ष आलोक मानकर,

वैद्यकीय आघाडी जिल्हा महामंत्री विशाल कामदार,महामंत्री भाजप नंदकिशोर कोहळे,उमेश पटले,नगरसेविका अनिता टेटवार,रजत गजभिये,सुखदेव शेंद्रे,अतुल पोटभरे,भोलाजी वगारे,आकाश वानखेडे,रॉकी चौरे,शुभम तलमले,संजय डोंगरे,सौ राधा यादव,सरिता जुवार,नागोराव वाढीवे आदी भाजप कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here