निराधारांना आधार पैलपाडा ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम…

कुरणखेड :-
क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त गावातील विधवा , परितक्त्या महिलांना तसेच वयोवृध्द नागरिकांना निराधार योजनेचा लाभ देण्यासाठी पैलपाडा ग्रामपंचायत घरोघरी जाऊन लाभार्थी अर्ज भरून घेणार आहे. अकोला तालुक्यातील पैलपाडा ग्रामपंचयतीमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. गावात कन्यारत्न प्राप्त होणाऱ्या

मातेला बक्षीस तसेच फळंझाड देणे हा स्तुत्य उपक्रम या ग्रामपंचायतीने जागतिक महिला दिनापासून सुरू केला आहे.दरम्यान सर्व थोर महात्म्यांच्या जयंतीला विविध उपक्रम राबविण्याचा मानस सरपंच वर्षा गौड यांनी व्यक्त केला आहे. ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पैलपाडा या गावातील विधवा परितकत्या

महिलांना तसेच वयोवृध्द नागरिकांना संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेचे अर्ज ग्रामपंचायत मार्फत दिले जातील.तसेच या योजनांचा लाभ मिळून देईपर्यंत ग्रामपंचायत च सर्व पाठ पुरवठा करेल अशी माहिती उपसरपंच गणेश मापारी यांनी दिली.

हा उपक्रम शासनाच्या सुचनांचे पालन करून राबविण्यात येईल. ग्रामपंचायतीने जल सप्ताह राबविला असून जल सप्ताहात घेतलेल्या रांगोळी,चित्रकला,आणि निबंध स्पर्धेच्या विजेत्यांना सुद्धा बक्षीस वाटप महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त केले जाणार असल्याचे ग्रामसेवक एस.आर.अवधूत यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here