राहुल मेस्त्री
देशात covid-19 लसीकरण बाजारात आल्यानंतर प्रशासनाने सर्वप्रथम कोरोना योद्धे म्हणून काम करणाऱ्या व स्वयंसेवकांना दिली असून तर दुसऱ्या टप्प्यात 45 वर्षावरील मधुमेह व रक्तदाब असणाऱ्या नागरिकांना covid-19 लसीकरण देण्यात आले होते.
कर्नाटक सरकारच्या नवीन आदेशानुसार 45 वर्षावरील सर्वच नागरिकांना आता covid-19 लसीकरण देण्यात येत आहे. कोगनोळी तालुका निपाणी येथे दिनांक 7 रोजी येथील 45 वर्षावरील सर्व नागरिकांना covid-19 लसीकरणाला मराठी मुलांची शाळा कोगनोळी येथे माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज वीरकुमार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ करण्यात आले.
यावेळी येथील आशा कार्यकर्त्यांनी covid-19 लसीकरणाच्या बॉक्सचे पूजन केले .तर परिचारिका आर एन नायक यांनी पहिला डोस बापुसो पासगोंडा पाटील आणि रंजना शिवाजी पाटील यांना दिला. हा लसीकरणाचा डोस दिल्यानंतर प्रत्येक नागरिकांना किमान अर्धा तास थांबण्यास सांगून त्यांच्याकडं लक्ष देण्यात येत असते व अर्ध्या तासानंतर त्यांना घरी पाठवण्यात येत आहे.
अशी माहिती येथील परिचारिकांनी दिली तर या लसीकरणाचा डोस घेण्यासाठी प्रत्येक नागरिकांना आपले आधार कार्ड घेऊन जावे लागणार आहे. याप्रसंगी मुख्याध्यापक तात्यासाहेब भोसले, अप्पासाहेब खोत, संजय खोत, विश्वजीत लोखंडे, कृष्णा खोत, बेनाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील एन आर तिगडे,ए एस मधाळे,आर के नायक,युसुफ खान यांच्या सह कोगनोळीतील आशा कार्यकर्त्या व ग्रामपंचायत मधील कर्मचारी उपस्थित होते.