INI CET 2021 | परीक्षेसाठी प्रवेश पत्र उपलब्ध; १६ जून रोजी परीक्षा…

न्युज डेस्क – ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS), नवी दिल्लीने बुधवारी ९ जून २०२१ रोजी आयएनआय सीईटी 2021 (INI CET) साठी अॅडमिट कार्ड जारी केले आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे, ते INI CET चे अॅडमिड कार्ड अधिकृत वेबसाइट aiimsexams.org येथून डाऊनलोड करू शकतात.

इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टंस कंबाइंड एन्ट्रन्स टेस्ट (INI CET), AIIMS, JIPMER, PGIMER आणि NIMHANS मध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी इच्छुक उमेदवारांसाठी आयोजित केली जाते.

आयएनआय सीईटी २०२१, मास्टर्स ऑफ सर्जरी (MS), डॉक्टर ऑफ मेडिसीन (MD), डॉक्टरेट ऑफ मेडिसीन (DM), मास्टर्स ऑफ चिरुर्गी (MCh), आणि मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी (MDS) मधील प्रवेशांसाठी १६ जून रोजी ऑनलाइन आयोजित केली जाणार आहे. INI CET 2021 मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांना पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जातो

परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी
ही परीक्षा १६ जून २०२१ रोजी होणार आहे. सुमारे ८० हजार डॉक्टरांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. करोना काळात डॉक्टर फ्रंटलाइन वर्कर म्हणून काम करत असल्याने या परीक्षेच्या उपस्थितीविषयी त्यांनी साशंकता व्यक्त केली आहे. ही परीक्षा लांबणीवर टाकावी, या मागणीसाठी डॉक्टरांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here