लाखांदूर तालुक्यात ५०० जनावरांना लंपी आजाराची लागण; पशुधन विभागाची माहिती…

लाखांदूर – नास्तिक लांडगे

लाखांदूर तालुक्यातील पशुवैद्यकीय केंद्र, लघूपशुचिकित्सालय व फिरते पशु चिकित्सा पथका अंतर्गत येणाऱ्या गावातील जवळपास पाचशे जनावरांना लंपी आजाराची लागण झाली आहे. सदर आजाराची माहिती लाखांदूर येथील पशुधन विभागासह सहाय्यक पशुधन आयुक्त कार्यालयांतर्गत देण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार गत काही महिन्यांपासून लाखांदूर तालुक्यातील गाय व म्हैस वर्गातील जनावरांना शरीरावर गाठी आल्याचे दिसून आले.

त्यानुसार सदर आजार लंपी हा विषाणूजन्य आजार असल्याचे निष्पन्न होताना पशुधन विभागाअंतर्गत पशु वैद्यकीय केंद्रातील सर्वच गावात गाय व म्हैस वर्गातील जनावरांवर औषधोपचारासह शिबीर देखील लावण्यात आले आहेत. या शिबिरा अंतर्गत गाय व म्हैस वर्गातील जनावरांवर औषधोपचार व गावात फवारणी देखील केली जात आहे.

दरम्यान लाखांदूर तालुक्यात बेलाटी विरली बु भागडी सरांडी बु रोहणी चप्राड़, पारडी बारव्हा व फिरते पशुचिकित्सालय अशी नऊ पशुवैद्यकीय केंद्र आहेत. या सर्व केंद्राअंतर्गत लंपी आजाराने बाधित जनावरांवर औषधोपचार सुरू असून सदर आजाराची परिस्थिती नियंत्रणात असल्याची देखील माहिती देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here