शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक थांबणार, भारतातील पहिलेच ॲग्री रिच क्यूसी ॲप विदर्भातील शेतकऱ्यांच्या सेवेत…

अमरावती – विदर्भातील शेतकरी निसर्गाच्या हुलकावणी नंतरही मोठ्या कष्टाने विविध पिकांचे उत्पादन घेत आहे. मात्र शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला हवा तसा भाव मिळत नाही हे अनेक वर्षापासूनची चित्र आहे. मात्र आता यापुढे शेतकरी गहू, तुर, मुंग, कापूस, हरभरा, सोयाबीन अशा अनेक शेतमालाची गुणवत्ता स्वतः तपासू शकणार आहे.

कृषी पुरवठा करणारा उद्योगसमूह असलेल्या सोहनलाल कमॉडिटी मॅनेजमेंट यांनी आपल्या प्रोपरायटरी अॅग्रीरीच अंतर्गत कृषी उत्पादनांसाठी क्वालिटी चेक या ॲपचे अनावरण केले आहे. येत्या काळात पीक काढणीच्या पार्श्वभूमीवर नवरात्रीच्या निमित्ताने या अॅपचे अनावरण करण्यात आले आहे.

अधिक माहितीनुसार , शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलमध्ये हे ॲप डाऊनलोड करून आपल्या शेतमालाचा फोटो या ॲप वर अपलोड करावा लागणार आहे. त्यानुसार हे ॲप त्या धान्याची गुणवत्ता अधोरेखित करणारं त्यानुसार शेतकरी स्वतः त्यांच्या शेतमालाचा भाव ठरवू शकणार आहे.

सुरुवातील हे अॅप गव्हासाठी सादर करण्यात येणार आहे, या अॅपच्या क्षमतांमध्ये हळुहळू चणा, मका, तांदूळ, गवार, मूग आणि तूर, सोयाबीन यांचा समावेश करण्यात येणार आहे. जगात प्रथमच सुरू करण्यात आलेल्या “अॅग्रीरीच मोबाइल क्वालिटी चेक अॅप”च्या माध्यमातून युझरला वस्तूच्या नमुन्याचे जिथल्या तिथे काही मिनिटांमध्ये मूल्यमापन करता येणार आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक टाळता येणार आहे अशी माहिती सोहनलाल कमॉडिटी मॅनेजमेंट समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप सभरवाल यांनी दिली. सभरवाल पुढे म्हणाले की “यामध्ये प्रक्रियादार, व्यापारी, निर्यातदार, आयातदार, सरकारी संस्था आणि बँकेसारख्या वित्त संस्था यासारख्या भागधारकांचा समावेश असून ४ वर्षांच्या सखोल संशोधनाचा परिपाक आहे.

वापरण्यास सुलभ

या अॅपने क्वालिटी चेक करणे हे एखादी इमेज टिपण्याइतके सोपे असेल. गव्हाच्या नमुन्याचा फोटो काढून तो अॅपच्या माध्यमातून सबमिट केल्यानंतर हे अॅप विविध गुणवत्ता निकषांवर या नमुन्याचे विश्लेषण करेल. युझरला छायाचित्र पुराव्यासह दर्जाचा अहवाल मिळेल. यात तुटलेला, आकुंचन पावलेला, कुजलेला किंवा अपरिपक्व दाणा, बाह्य घटक आणि उंची, लांबी, ग्रिड, रंग आणि पॅटर्न यासारख्या पैलूंचे कमॉडिटीचे विश्लेषण मिळेल.

बॅक एंड सिस्टिममध्ये आधीच भरलेल्या डेटाशी या परिणामांची स्वयंचलितपणे तुलना केली जाते. हा डेटा पायथन प्रोग्रॅमिंग लँग्वेजने रिअल-टाइम बेसिससह आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) आणि मशीन लर्निंग (एमएल) यांची सांगड घालून नियमित अपडेट होत राहतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here