इंडियन बिझनेस डिस्ट्रिब्युटरशिप एक्सपो २०२१ चे आयोजन…

न्युज डेस्क ट्रेड इंडिया या देशातील आघाडीच्या बी२बी ऑनलाइन मार्केट प्लॅटफॉर्मने त्याचे सब व्हेंचर गेटडिस्ट्रिब्युटर्स.कॉमसोबत आणखी एक नवा ट्रेड इव्हेंट- ‘इंडियन बिझनेस डिस्ट्रिब्युटरशिप एक्सपो २०२१’ आयोजित करण्याची तयारी पूर्ण केली आहे. ११-१३ ऑगस्ट दरम्यान होणारी ही प्रीमियम व्हर्चुअल परिषद, न्यू नॉर्मलमध्ये योग्य व्यावसायिक वातावरण तयार करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल.

याद्वारे अनेक उद्योग भागीदार आणि भागधारकांना डिजिटल पद्धतीने कनेक्ट होण्यासाठी तसेच असंख्य संधी आणि वृद्धीकरिता मदत होईल. अशा प्रकारचा व्यापक आणि महत्त्वाचा कार्यक्रम, हा एक्सपो देशातील महामारीनंतर संघर्ष करत असलेल्या व्यवसाय क्षेत्रात नवा ताजा श्वास घेण्यासाठी महत्त्वाचे कार्य करेल.

ट्रेड इंडियाचे सीईओ श्री संदिप छेत्री म्हणाले की, “व्हर्चुअल कार्यक्रमाद्वारे सुसंगत बिझनेस पार्टनर प्रदान केले जातील. तसेच एक सुरक्षित आणि शाश्वत डिजिटल चित्र उभे राहिल, ज्यातून व्यवसायांच्या संधी वाढतील.

याद्वारे विविध उत्पादनांच्या श्रेणीतील उत्पादकांना त्यांचे उत्पादन हे वितरक, स्टार्टअप्स, उद्योजक आणि ओईएम बिझनेस सहयोगींच्या भव्य उपस्थितीत प्रदर्शित करण्याची संधी मिळेल. थोडक्यात, वितरक बनून नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यवसाय क्षेत्रातील व्यक्ती आणि संस्था या दोघांनाही विविध स्वरुपातील प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी हे प्रदर्शन सज्ज आहे.”

यात उद्योगातील प्रमाणित तज्ञ आणि उद्योग मालकांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळेल. यातून कंपन्यांना नेहमीपेक्षा जास्त ठिकाणी आघाडी मिळवणे शक्य होईल. तसेच लोकांना उद्योजकांमध्ये रुपांतर करण्याच्या अनेक संधीही निर्माण होतील. प्रत्येकाच्या प्राधान्याचा बिझनेस निवडण्याचे स्वातंत्र्य देत ट्रेडइंडिया, सहभागी आणि व्यवसाय मालकांना जगाती काही जून्या आणि प्रतिष्ठित ब्रँडसोबत जोडण्याची आकर्षक संधी प्रदान करत आहे.

यात कृषी, वस्त्र व फॅशन, वाहन-ई रिक्षा, इलेक्ट्रिक वाहने, लुब्रिकंट, कार क्लीनिंग उत्पादने इत्यादींचा समावेश असेल. तसेच रसायने, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल सप्लाइज, अन्न व पेय, भेटवस्तू आणि हस्तकला, आरोग्य व सौंदर्य, होम सप्लाय इत्यादी श्रेणींचा यात समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here