Vijay Mallya | फरार मद्यसम्राट विजय मल्ल्याविरोधात भारतीय बँकां एकवटल्या…लंडनच्या कोर्टात मांडले म्हणने..!

मनोहर निकम :- फरार मद्यसम्राट विजय मल्ल्याविरोधात दिवाळखोरीचा आदेश मिळावा यासाठी भारतीय बँकांच्या संघटनेने लंडनमधील न्यायालयात धाव घेतली आहे. मल्ल्याची सध्या मोडकळीस आलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचे कर्ज वसूल करण्यासाठी भारतीय बँका प्रयत्न करीत आहेत. आभासी सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंनी अंतिम युक्तिवाद मुख्य दिवाळखोर आणि कंपनी कोर्टाचे न्यायाधीश मायकेल ब्रिग्ज यांच्या समोर मांडले.

या प्रकरणात भारतीय मालमत्तांवर दिलेली सुरक्षा माफ करण्याचा त्यांचा अधिकार असल्याचे भारतीय बँकांचे म्हणणे आहे. ही सुरक्षा सोडल्यानंतर लंडनमधील मल्ल्याच्या मालमत्तांमधून बँका कर्ज वसूल करू शकतील. त्याचवेळी मल्ल्याच्या वकिलांचा असा युक्तिवाद आहे की भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे पैसे खासगी नसून सार्वजनिक मालमत्ता आहेत.

अशा परिस्थितीत त्यांना सुरक्षा सोडण्याचा अधिकार नाही. येत्या काही आठवड्यात यासंदर्भात निर्णय अपेक्षित आहे. फसवणूक आणि मनी लाँडरिंगच्या प्रकरणात भारत सरकार मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनशी बोलत आहे. मल्ल्याचे भारतीय बँकांचे नऊ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे.

एसबीआयच्या नेतृत्वात एकूण 13 भारतीय वित्तीय संस्थांनी मल्ल्याविरोधात याचिका दाखल केली आहे. यामध्ये बँक ऑफ बडोदा, कॉर्पोरेशन बँक, फेडरल बँक, आयडीबीआय बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, जम्मू आणि काश्मीर बँक, पंजाब आणि सिंध बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, युको बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि जेएम फायनान्शियल अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here