India Post GDS Recruitment 2021 | बिहार आणि महाराष्ट्रात पोस्टल सर्कलमध्ये ४,३६८ पदे रिक्त…

न्युज डेस्क – इंडिया पोस्टने बिहार आणि महाराष्ट्र पोस्टल सर्कलमधील ग्रामीण डाक सेवक (जीडीएस) च्या एकूण 4,368 रिक्त जागा भरण्याची घोषणा केली आहे. अर्ज अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत आणि ते जमा करण्याची शेवटची तारीख 26 मे आहे. एकूण रिक्त 4,368 जागांपैकी बिहार पोस्टल सर्कलमध्ये 1,940 तर 2,428 रिक्त जागा महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये आहेत.

भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 26 मे 2021 पर्यंत इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइट appost.in पोस्ट साठी अर्ज करू शकता.

वय श्रेणी
या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार 18 ते 40 वर्षे वयोगटातील असावेत.

पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांना दहावी पास प्रमाणपत्र असावे. उमेदवारांना गणितामध्ये उत्तीर्ण गुण असणे आवश्यक आहे, त्यांना स्थानिक भाषेचे ज्ञान असावे आणि इंग्रजी भाषेचा अभ्यास केलेला असावा (अनिवार्य किंवा वैकल्पिक विषय म्हणून अभ्यास करावा ).

अर्ज फी
अनारक्षित / ओबीसी / ईडब्ल्यूएस पुरुष / ट्रान्समन श्रेणीतील उमेदवारांना अर्ज फी म्हणून 100 रुपये द्यावे लागतील. अनुसूचित जाती / जमाती / महिला / ट्रान्सवुमन / पीडब्ल्यूडी उमेदवारांना नोंदणी फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here