IND vs ENG | भारताने इंग्लंडला पराभूत केले…

न्यूज डेस्क – अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या भारत आणि इंग्लंड दरम्यान खेळण्यात आलेल्या सामन्यात भारताचा दणदणीत विजय झाला. भारताने इंग्लंडला 25 धावा आणि डावांनी पराभूत केले. भारतीय गोलंदाजांनी अवघ्या तीन दिवसांत इंग्रजांना गुडघ्यावर आणले. भारतीय गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल यांनी 5-5 विकेट घेतल्या.

या विजयासह भारतीय संघाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी पात्रता मिळविली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना 22 जूनला इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर खेळला जाईल. अश्विनने 55 व्या षटकात ५० रन बनविणाऱ्या डॅन लॉरेन्सला बोल्ड केले आणि इंग्लंडने गुडघे टेकले.

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर वॉशिंग्टन आणि अक्षर पटेल यांनी पुन्हा एकदा इंग्लंडच्या गोलंजांसमोर विकेट मिळवण्यासाठी आव्हान निर्माण केलं होतं. दोघांनी मिळून एकूण १०० धावांची भागीदारी केला. मात्र ४३ धावांवर असताना अक्षर पटेल रन आऊट झाला आणि अर्धशतकाची संधी हुकली.

दुसरीकडे वॉशिंग्टन सुंदरकडे मात्र शतकाची संधी होती. पण इशांत आणि सिराज यांनी आपली विकेट गमावल्यामुळे शतकाची संधी पुन्हा एकदा हुकली. वॉशिंग्टन ९६ धावांवर नाबाद राहिला. ३६५ धावांवर ऑल आऊट झालेल्या भारतीय संघाने १६० धावांची आघाडी घेतली होती.

यानंतर भारताचे अव्वल फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल यांनी इंग्लिश संघावर वर्चस्व गाजविले. अक्षर आणि अश्विनने अशा प्रकारे फलंदाजांवर वर्चस्व ठेवले की खेळाडूंच्या लागोपाठ विकेट्सने त्यांना पवेलीयन मध्ये पाठवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here