शेतीच्या सिंचनाच्या मान्यतेस होत असलेल्या राजकीय आंदोलनास इंदापूरकरही जशास तसे उत्तर देण्यासाठी तयार…प्रताप पाटील

भिगवण ( प्रतिनिधी ) इंदापूर तालुक्याला पुणे व पिंपरी शहरातून उजनी जलाशायामध्ये वाहून येणारे सुमारे ५ टीएमसी सांडपाणी शेतीच्या सिंचनाच्या मान्यतेस होत असलेल्या राजकीय आंदोलनास इंदापूरकरही जशास तसे उत्तर देण्यासाठी तयार झाले असुन सांडपाण्यासाठी रक्त सांडण्याची वेळ आली तरी तयार आहोत असे जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील म्हणाले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, हनुमंत बंडगर, प्रकाश ढवळे, सचिन सपकळ, दादा वणवे, आबासाहेब देवकाते, तुकाराम बंडगर, पांडुरंग मारकड नवनाथ रुपनवर, माउली भोसले आदी शेटफळगढे येथील बैठकीस उपस्थित होते.

उजनी जलाशयावर सोलापूरचा जसा हक्क आहे तसा इंदापूर मधील विस्थापित गावांचा देखील आहे मात्र आम्ही राजकारण न करता हक्क मागत आहोत उजनीच्या पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली २० टी एम सी पाणि नदीपात्रातुन सोलापुरच्या शेतकऱ्यांना दिले जाते आक्टोबर नंतर उजनीतुन पाणि सोडण्यास मनाई आहे फक्त दहा योजनांना मान्यता असताना पाणि वाटपाचा खेळखंडोबा केला जातो आणि इंदापूर तालुका मागत असलेले हक्काचे पाणि मिळत नाही मात्र आमच्या हक्काच्या पाण्याला कोण विरोध करत असेल तर जशास तसे उत्तर देउ असे पांडुरंग मारकड म्हणाले.

इंदापूर मधील शेतकऱ्यांवरती अन्याय होत असल्याने पुणे व पिंपरी शहरामधून वाहून येणारे सुमारे ५ टीएमसी सांडपाणी इंदापूरसाठी देण्याची उपसा सिंचन योजना प्रस्तावित शासनाने प्रस्तावित केली आहे. या योजनेद्वारे उजनी जलाशयातून ५ टीएमसी पाणी उचलून खडकवासल्याच्या शेटफळगढे जवळील कालव्यामध्ये सोडण्यात येणार आहे. सणसर कट मधून नीरा डाव्या कालवा व खडकवासल्याच्या कालव्यातून तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनासाठी पाणी मिळणार आहे.

वर्षभरामध्ये खरीप पिकांसाठी एक वेळा, रब्बी साठी दोन वेळा व उन्हाळी हंगामासाठी एक वेळा असे चार वेळा उपसा सिंचन योजनेद्वारे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी देण्यात येणार आहे. या पाण्याचा वापर तालुक्यातील सुमारे ६३ हजार एकर क्षेत्राला होणार आहे. मात्र राजकीय स्वरूप निर्माण करुन आंदोलनाच्या माध्यमातून सोलापूर मधील बोटावर मोजता येतील येवढे पुढारी विरोध करुन आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत याला भविष्यात न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाने उत्तर देण्याचा निर्णय घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here