IND vs NZ Test | तोंडात गुटखा आणि क्रिकेटचा सामना…वसीम जाफरनी शेयर केले मजेदार मिम…

फोटो-सोशल मिडिया

न्युज डेस्क – भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपूर येथे पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खराब प्रकाशामुळे पहिल्या दिवसाचा खेळ लवकर संपला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने 84 षटकांत 4 गडी गमावून 258 धावा केल्या आहेत. भारतासाठी श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजा या दोन्ही फलंदाजांनी अर्धशतकं झळकावली आहेत.

या सामन्यादरम्यान प्रेक्षक गॅलरीतही एकच खळबळ उडाली होती. ग्रीन पार्क स्टेडियमच्या गॅलरीत एक चाहता आनंदाने गुटखा खात पहिल्या दिवसाचा खेळ पाहत होता. कॅमेऱ्यात येताच त्याची स्टाइल मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. भारताचा माजी सलामीवीर वसीम अक्रमनेही या शैलीवर भाष्य केले आहे. वसीम जाफरने ट्विटद्वारे एक मीम शेअर केला आहे.

पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात किवी संघाने 3 विकेट्स घेत टीम इंडियाला बॅकफूटवर पाठवले. यानंतर पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यरने अर्धशतक झळकावले आणि सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रवींद्र जडेजानेही अर्धशतक झळकावत भारतीय संघाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी चाहत्यांना या दोन फलंदाजांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here