IND vs NZ 2nd Test | एजाज पटेलने १० विकेट घेत रचला इतिहास…भारताचा पहिला डाव ३२५ धावांवर आटोपला

फोटो -सोशल मिडिया

न्यूज डेस्क – भारतीय वंशाचा किवी फिरकीपटू एजाज पटेलने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारतासाठी सर्व 10 बळी घेत इतिहास रचला आहे. कसोटी क्रिकेटच्या एका डावात १० बळी घेणारा तो जगातील तिसरा आणि न्यूझीलंडमधील पहिला गोलंदाज ठरला आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, किवी फिरकीपटू एजाज पटेलने कसोटी क्रिकेटच्या एका डावात सर्व 10 बळी घेणारा जगातील तिसरा आणि आपल्या देशातील पहिला गोलंदाज बनून भारताविरुद्ध इतिहास रचला.

एजाजच्या आधी इंग्लंडचा जिम लेकर आणि भारताचा अनिल कुंबळे यांनी हा पराक्रम केला आहे. त्याच्या शानदार गोलंदाजीमुळे भारताचा पहिला डाव 325 धावांवर आटोपला. भारताकडून मयंक अग्रवालने 150 धावा केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here