शहर वाहतूक शाखेच्या “हरविले-परत केले” ह्या मोहिमेत, ऑटो चालकां सोबतच, सर्व सामान्य नागरिकांचाही वाढता सहभाग…

हरविलेला महागडा मोबाईल केला परत…

मागील एक वर्षा पासून अकोला शहरातील चौका चौकात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांनी त्यांना सापडलेले सर्वसामान्य नागरिकांचे मोबाईल, पाकिटे, पर्स, महत्वाची कागदपत्रे असलेली पिशवी, मुळ मालकांचा शोध घेऊन वेळोवेळी परत केली आहेत,

ह्या मोहिमेत ऑटो चालकाचा सहभाग वाढवा ह्या साठी शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी ऑटो चालकांची मीटिंग घेऊन त्यांना मार्गदर्शन केल्याने ऑटो चालकांनी सुद्धा ऑटोत राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या चीजवस्तू प्रामाणिक पणे वाहतूक शाखेत आणून जमा केल्या ह्या कार्याला व्यापक प्रसिद्धी मिळाल्याने सर्वसामान्य नागरिक सुद्धा आता ह्या मोहिमेत सहभागी झाले असून ह्याचाच प्रत्यय देणारी घटना आज समोर आली.

झाले असे की लक्ष्मी नगर येथे राहणारी तरुणी भाविका मयूर जैन ह्यांचा मोबाईल घाई गर्दीने रस्त्यावरून दुचाकीवरून जातांना पडला तो मोबाईल आश्विन सोनी रा लक्ष्मी नगर ह्या तरुणाला मिळाला त्यांनी तो मोबाईल व त्याचे कव्हर मध्ये सापडलेले 500 रुपये,नेहरूपार्क येथे कर्त्यव्य बजावीत असलेल्या वाहतूक अंमलदार ज्ञानेश्वर वरणकर ह्यांना दिला,

त्यांनी तो ऑफिसमध्ये आणून पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांना दिला, मुळ मोबाईल मालकाचा शोध घेतला असता तो महागडा मोबाईल भविका जैन ह्या तरुणीचा असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर तरुणीला त्यांचे पती सोबत वाहतूक कार्यालयात बोलावून सदर मोबाईल त्यांना परत केला असता त्यांनी अश्विन सोनी व वाहतूक पोलिसांचे आभार व्यक्त केले,

मोबाईल व पैसे प्रमाणिकतेचा परिचय देऊन वाहतूक पोलिसांच्या स्वाधीन करणाऱ्या आश्विन सोनी ह्या तरुणाचा सुद्धा पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी कार्यालयात बोलावून पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. अश्याच प्रकारे सर्वसामान्य नागरिकांना पुढाकार घेऊन एखादी चीजवस्तू रस्त्यावर सापडल्यास वाहतूक शाखेत किंवा चौकात तैनात वाहतूक पोलिसांचे स्वाधीन करावी, मुळ मालकाचा शोध घेऊन सदर चीजवस्तू त्यांना परत करण्यात येईल, असे आवाहन शहर वाहतूक पोलिसांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here