चिंताजनक | मूर्तिजापूर शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ…

अकोला जिल्ह्यात वाढता कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. मूर्तिजापूर शहरात काल 29 आणि आज 15 असे एकूण 44 लोक कोरोना पॉझिटिव्ह आलेले असून शहरात पुन्हा चिंतेचा विषय निर्माण झाला असल्याने आता पुन्हा लॉकडाऊन लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तर काल आणि आज मिळून ४४ रुग्ण आढळले तर यातील 41 हे शहर भागातील आहेत आणि तीन ग्रामीण भागातील आहेत एक सालतवाडा एक हादगाव आणि एक उमरी अरब….

शहरी भागामध्ये करोना चा प्रादुर्भाव नव्याने वाढत आहे सबब सर्व नागरिकांनी मास्क घालणे सामाजिक अंतर पाळणे आणि कोणतेही एका ठिकाणी गर्दी न करणे याबाबतची दक्षता घेणे आवश्यक आहे अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल..
उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here