धोबी समाजाला अनुसुचित जाती प्रवर्गात समावेश करा; मुख्यमंञ्यांना निवेदनातुन केली मागणी…

लाखांदुर – नास्तिक लांडगे

१९६० च्या दशकापुर्वी राज्यातील भंडारा व बुलढाणा या दोन जिल्ह्यातील धोबी समाज अनुसुचित जाती प्रवर्गात समाविष्ट होता माञ १९६० नंतर सदर समाज ईतर प्रवर्गात वर्ग करण्यात आल्याने या समाजाचे आर्थिक , सामाजिक , शैक्षणिक व राजकिय नुकसान झाले आहे.

केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागा अंतर्गत या समाजाला अनुसुचित जाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यासाठी १० महिण्यपुर्वी शासनाने माहिती मागविली असतांना देखील आतापर्यंत सदरची माहिती पाठविण्यात आली नसल्याचा आरोप करुन हेतुपुरस्पर या समाजाचे आर्थिक , सामाजिक , शैक्षणिक व राजकिय नुकसान केले.

जात असल्याचा ठपका ठेऊन या समाजाचे तात्काळ अनुसुचित जाती प्रवर्गात समावेश करा अशा मागणीचे निवेदन लाखांदुर चे नायब तहसिलदार देविदास पाथोडे यांच्या मार्फत गत ४ सप्टेबर रोजी राज्याच्या मुख्यमंञ्यांना पाठविण्यात आले आहे.

सदरच्या निवेदनकर्त्यांमध्ये फागो कडीखाये , शंकर मेश्राम , भोजराज कडीखाये , राकेश बोरकर , अविनाश मेघराज , आकाश केझरकर , गोवर्धन कडीखाये आदिंचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here