सांगली जिल्ह्यातील प्रत्येक घटकाला पक्षात समाविष्ट करून घ्या – ना. जयंत पाटील…

सांगली – ज्योती मोरे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी झटणारा, लढणारा पक्ष आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक घटकाला पक्षात समाविष्ट करून घेतले पाहिजे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांनी व्यक्त केले.ते आज सांगली येथे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सभासद नोंदणी अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून लोकशाही पद्धतीने प्रत्येक कार्यकर्त्यांला संधी देत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने काम केले पाहिजे. पक्षाची सभासद नोंदणी करीत असताना युवक, महिला, विद्यार्थी कॉंग्रेस या सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी युवक वर्गाचा सहभाग वाढविला पाहिजे.

जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील व जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांचे सभासद नोंदणी अर्ज भरून घेत त्यांची क्रियाशील सभासद म्हणून नोंदणी करून घेतली.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, युवक जिल्हाध्यक्ष विराज नाईक, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश पाटील, युवती जिल्हाध्यक्ष पुजा लाड, सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी सदस्य आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here