अतिक्रमण हटावच्या कारवाइखाली; भरपावसाळ्यात वनविभागाने बहुरूपी कुटुंबाला केले बेघर, कन्हाळगाव येथील घटना…

लाखांदूर – नास्तिक लांडगे

गावात स्थावर मालकीचे घर नसल्याने पत्नी व चार अल्पवयीन लेकरांना घेऊन एका बहूरूपी कुटुंबाने चार महिन्यापूर्वी गावालगत च्या वनजमिनीवर अतिक्रमण करून झोपडी उभारली. या झोपडी लगतच्या परिसरात अन्य कुटुंबेही वनजमिनीवर अतिक्रमण करून झोपडीत वास्तव्यास आहेत.

मात्र संबंधितांकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष करीत अतिक्रमण हटाव च्या कार्रवाईखाली भर पावसाळ्यात वनविभागाने एका बहुरूपी कुटुंबाला बेघर केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सदर घटना लाखांदूर तालुक्यातील बीट क्र.320संरक्षित वन कन्हाळगाव येथे 11 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली.

जयेंद्र रमेश तीवसकर (35)रा. कन्हाळगाव असे पीडित बहूरूपी युवकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार बहुरूपी या भटक्या जमातीत जन्मलेल्या जयेंद्र चे गावातीलच आरती(27) नामक युवतीशी काही वर्षांपूर्वी विवाह झाला. विवाह पश्चात त्यांना यश कुमारी(9), दिव्या(7), प्रेम(3)व अश्विनी(2) अशी चार अपत्ये आहेत.

बहुरूपी समाजातिल सबंधित कुटुंबीय गावोगावी भटकून भीक मागून कसाबसा उदरनिर्वाह चालवीत आहेत. मात्र गत चार महिन्यापूर्वी कोरोना विषाणू मुळे सर्वत्र लाक डाऊन करण्यात आल्याने सबंधी कुटुंब गावातच स्थिरावले. मात्र गावात स्थिरावताना मालकी स्थावरघर नसल्याने या कुटुंबाने गावाबाहेरील वन जमिनीवर अतिक्रमण करून अन्य कुटुंबाप्रमाणे निवासाची झोपडी उभारली.

या झोपडीत सबंधित कुटुंब तब्बल चार महिन्यांहून अधिक काळापासून लेकरा बाळासह वास्तव्यास असल्याची माहिती देण्यात आली. मात्र सदर कुटुंबाने अतिक्रमण करुन उभारलेल्या झोपडीची माहिती लाखांदूर वनविभागाला होताच संबंधित कुटुंबाला नाममात्र सूचना पत्र देऊन तडकाफडकी झोपडी नष्ट करण्यात आली. यावेळी बहुरूपी कुटुंबाचे संसारोपयोगी सर्व भांडीकुंडी, अन्नधान्य ,कपडेलत्ते व अन्य साहित्य उघड्यावर पडताना लहान लेकरांना घेऊन भर पावसाळ्यात निवारा कोठे शोधावा?

हा मोठा प्रश्न कुटुंबापुढ़े उभा ठाकला आहे. गावातील अन्य कुटुंबांचे या झोपडी परिसरात अतिक्रमण करून वास्तव्य असताना संबंधितांचे विरोधात कोणतीच कार्यवाही न होताना भर पावसाळ्यात वन विभागाने केलेल्या कार्यवाही ने गावकऱ्यांत तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक बेघर कुटुंबांना निर्वासित करण्यासाठी शासन स्तरावर उपाय योजना केल्या जात असताना वनविभागाने अतिक्रमण हटाव च्या नावाखाली भर पावसाळ्यात एका बहुरूपी कुटुंबाला बेघर करणे सर्वत्र संतापजनक ठरले आहे. याप्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेऊन वनविभागांतर्गत बहुरूपी कुटुंबाला भर पावसाळ्यात बेघर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यां विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी तालुक्यातील जनतेत केली जात आहे .

जयेंद्र रमेश तीवस्कर यांनी कक्ष क्रमांक 320 व गट क्रमांक 7 कन्हाळगाव मध्ये संरक्षित वन जमिनीवर झोपडी बांधून अतिक्रमण केले होते. ते कुटुंबासह या झोपडीत वास्तव्य देखिल होते. आज 11 सप्टेंबर रोजी लाखांदूर च्या सर्व वन कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन सबंधीत कुटुंबाच्या संमतीनेच सदरचे अतिक्रमण हटविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here