भरधाव ट्रक मेंढ्यांच्या कळपात घुसला…१०२ मेंढ्या चिरडल्या गेल्या…परतवाडा-अंजनगाव मार्गावरील घटना…

अमरावतीच्या परतवाडा ते अंजनगाव मार्गावर १५० मेंढरांच्या कळपामध्ये एक भरधाव वेगात ट्रक घुसल्याची घटना नुकतीच घडली आहे. आणि यामध्ये१०२ मेंढ्या ट्रकखाली चिरडला गेल्यात. या घटनेत ४० पेक्षा जास्त मेंढ्या जखमी झाल्यात. त्यामुळे मेंढी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

परतवाडा वरून अंजनगावसुर्जी कडे जाणारा हा भरधाव ट्रक मेंढरांच्या कळपामध्ये घुसला. आणि १०२ मेंढ्या यामध्ये चिडला गेल्यात. सध्या घटनास्थळी आता पोलीस पोहोचलेत. पोलिसांनी घटनेचा तपास आता सुरु केलाय. मात्र या ट्रक चालकावर निश्चित कारवाई व्हावी अशी मी मागणी मेंढी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून केली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here