वंचित बहुजन आघाडी तर्फे संजय नगर मुकुंदवाडी वार्ड कार्यालयाचा उद्घाटन व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा कार्यक्रम सपंन्न…

औरंगाबाद – विजय हिवराळे

दिनांक २३ ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी ६ वाजता वंचित बहुजन आघाडी तर्फे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा वार्ड ८१ संजयनगर मुकुंदवाडी औरंगाबाद संपर्क कार्यालय उद्घाटन शाखा स्थापना कार्यक्रम करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष एडवोकेट धनराज वंजारी राष्ट्रीय उपाध्यक्ष यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचे उद्घाटन व रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजक सतिश आसाराम गायकवाड यांच्या द्वारे करण्यात आले.

यावेळी प्रमुख उपस्थिती प्राध्यापक किसन चव्हाण, विष्णू जाधव, अशोक हिंगे, धर्मराज चव्हाण, नितीन सोनवणे, केशव मुददेवाड, फारूक अहमद, अमित भुईगळ, जितेंद्र शिरसाठ, योगेश बन, प्रभाकर बकले, जमील देशमुख, संदीप शिरसाठ आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here