Saturday, June 15, 2024
spot_img
Homeराज्यसुकळी/डाक येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण...

सुकळी/डाक येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण व वार्षीकोत्सवाचे उद्घाटन…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

श्री स्वामीं चक्रधर महाराज यांची पावन भूमी असलेल्या ग्राम सुकळी/डाक येथे विविध विकास बांधकामाचे लोकार्पण, भूमिपूजन व जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या त्रिदिवसीय शालेय वार्षीकोत्सवाच्या सांस्कृतीक कार्यक्रमांचे उद्घाटन माजी आमदार राजेंद्रजी जैन यांच्या शुभहस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठया थाटात संपन्न झाला.

याप्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन मार्गदर्शन करताना म्हणाले की, आमचे नेते खासदार प्रफुल पटेल हे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कोणताही राजकीय भेदभाव न ठेवता सदैव कटिबद्ध असून शेतकऱ्यांच्या धानाला हेक्टरी 20 हजार रुपये बोनस मिळवून देण्याचे काम केले आहे. या परिसरात अदानी पावर प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार व (CSR) सामाजिक दायित्व उपक्रम योजना अंतर्गत गावागावात अनेक विकासाची कामे झाली आहेत. सर्व सामान्य जनता, शेतकरी व शेतमजूर यांच्या समस्या समजून त्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहू असे प्रतिपादन जैन यांनी केले.

माजी आमदार जैन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, शाळा हे संस्काराचे केंद्र आहे आणि शाळेत संस्काराचे अनमोल मोती घडविण्यासाठी स्नेहसंमेलना सोबतच वर्षभर विविध शैक्षणिक स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन करणे गरजेचे आहे. शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच सुसंस्कृत व नैतिक मूल्यांचे जतन करून उत्तम समाज घडविण्याचे कार्य करावे.

या सोहळ्या प्रसंगी राजेंद्र जैन, प्रेमकुमार रहांगडाले, जगदीश बावनथडे, राजलक्ष्मी तुरकर, केतन तुरकर, नीता रहांगडाले, सुनील मेश्राम, संदीप कुर्वे, तिरत मेश्राम, रवी पटले, डॉ.संदीप मेश्राम, तारेश्वरी बावनथडे, विजय लिल्हारे, एस एस जाधव, राजेश तोंडकर, पी एम पटले, चंद्रशेखर बिसेन, रूपाली राणे, जगदीश जांभुळकर, कुंभरेजी, वालदेजी, भोजराज ऊके, विजय बिसेन,रौनक ठाकूर, हितेंद्र जांभुळकर, सरिता तुमसरे, कटरे मॅडम, शालु पटले, छाया धुर्वे, प्रतिमा शेंडे, पटलेताई, हिमालीताई बिसेन सहीत मोठ्या संख्येने नागरिक, पालक वर्ग, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: