कोगनोळी मराठी शाळेत दोन नव्या ईमारतींच्या खुदयीकामाला शुभारंभ…

कोगनोळी – राहुल मेस्त्री

कोगनोळी ता.निपाणी येथे चिक्कोडी लोकसभा मतक्षेत्राचे खासदार आण्णासाहेब जोल्ले व निपाणी विधानसभा मतक्षेत्राच्या कर्तव्यदक्ष आमदार आणि राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री नामदार शशिकला जोल्ले यांच्या विषेश प्रयत्नातून कोगनोळी मराठी मुला-मुलींची शाळा याठिकाणी शाळेसाठी दोन नवीन ईमारती मंजूर केल्या आहेत.

सदर दोन ईमारती मुला-मुलींसाठी प्रति अकरा लाख रुपयाप्रमाने एकुण बावीस लाखाचा निधी उपलब्ध झाला आहे. खुदयीकामाचा शुभारंभ कोगनोळीतील ज्येष्ठ भाजपा कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आला. तर पुजेची विधी शाळेतील उपस्थित शिक्षिकेच्या हस्ते झाले.

स्वागत, प्रास्ताविक करताना कोगनोळी भाजपा अध्यक्ष कुमार पाटीलांनी कोरोनाच्या प्रादुर्भावाने ज्यांना जिव गमवावा लागला आहे त्यांना आदरांजली वाहिली.पुढे म्हणाले बांधकाम ठेकेदाने यामध्ये जातीने लक्ष केंद्रित करून चांगले बांधकाम करावे व आदर्श निर्माण करावा.

कारण मंत्री महोदयांच्या आजपर्यंतच्या कोणत्याही विकास कामाची तक्रार आलेली नाही.आभार व्यक्त करताना शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष विष्णु कदम यांनी येणाऱ्या काळात नवीन ईमारती ऐवजी जुन्या ईमारतींच्या डागडुजी साठी निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी करून आभार मानले.

यावेळी मुख्याध्यापक भोसले सर, विलास नाईक, सुनील माने,कुमार व्हटकर, बबलु पाटील,नामदेव यादव, सचिन निकम,अनंदराव हंचनाळे,मोहन विटे,यौवान कांबळे, जिवन सांगले,रंगराव कागले, श्रीकांत पाटील,प्रितम शिंत्रे यांच्या सह शाळेतील शिक्षक, शिक्षिका व अन्य नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here