वरदीतील निसर्गप्रेमींनी फुलवलेल्या बगीचाचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन…

राहुल मेस्त्री

आपण जर एखादा पोलीस स्टेशन बघितलं तर बहुतांश पोलिस स्टेशनच्या आवारामध्ये मोठा परिसर असतो. त्यामध्ये आपल्याला अपघात झालेल्या गाड्या इतर काही असे बरेच दिसत असते. मात्र महाराष्ट्रातील एक असे पोलीस स्टेशन आपण पाहिलं आहात का?..

नसेल तर याला अपवाद कोल्हापूर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्राचे राजकीय विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या कागल पोलीस स्टेशनचे एक ज्वलंत उदाहरण आहे. याचं कारण कागलचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय नाळे यांच्या संकल्पनेतून एक अशी बगीचा निर्माण केली आहे.

की त्या ठिकाणी जर दोन मिनिट आपण थांबलात तर मनाला शांती मिळेल असे.. हे खरच आहे.. कारण कागल पोलीस स्टेशन मधील पूर्वी राजवाडा म्हणून समजल्या जाणाऱ्या आणि तत्कालीन तहसीलदार कार्यालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात तहसीलदार कार्यालय स्थलांतर झाल्यानंतर त्या ठिकाणचा परिसर अत्यंत ओसाड पडलेल्या अवस्थेत होता.

मात्र याच ओसाड पडलेल्या परिसराला पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्या संकल्पनेतून सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे ,उपनिरीक्षक प्रीतम पुजारी, उपनिरीक्षक देखील कर्चे आणि इतर पोलिस कर्मचाऱ्यांच्या श्रमदानातून मनाला अत्यंत शांती वाटेल अशी आणि महाराष्ट्राला प्रेरणादायी ठरेल अशी बगीचाच निर्माण केली आहे…

तर या बगीचाचे उद्घाटन महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री व कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल पोलीस स्टेशन मधील सर्व अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.. यावेळी त्यांचा सत्कार पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्या हस्ते करण्यात आला…

या उद्घाटन वेळी केडीसीसी बँक संचालक प्रताप उर्फ भैय्या बाबा माने, कागल पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे,सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे ,पोलीस उपनिरीक्षक निखिल कर्चे ,प्रीतम कुमार पुजारी व पोलीस अंमलदार व कर्मचारी उपस्थित होते.

या निर्माण केलेल्या बगीचा बद्दल पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांना विचारले असता म्हणाले मुळात आपले बीएससी ऍग्रीचे शिक्षण झाले असून ज्या ज्या ठिकाणी माझी बदली होत असते. त्या ठिकाणी नेहमीच सुंदर निसर्गगम्य वातावरण कसं ठेवता येईल याकडे लक्ष देत असतो.

पोलीस स्टेशन मध्ये अनेक लोक आपले दुःख ,यातना घेऊन येत असतात.त्यांना याठिकाणी थांबल्यानंतर किमान थोड्या तरी आपल्या यातना आणि दुःख कमी होण्यास नक्कीच मदत होईल असे सांगितले.

तर सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे म्हणाले आमचे वरिष्ठ अधिकारी नाळे साहेब यांनी या ठिकाणी बगीचा करण्याची संकल्पना मांडल्या प्रमाणे आम्ही येथील पोलीस कर्मचारी यांच्या श्रमदानाने आणि देणगीदारांच्या मदतीने ही बगीचा पूर्णत्वास घेऊन आलो आहोत व यासाठी नाळे साहेब याचे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन लाभले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here