वीज कंत्राटी कामगारा HDFC बँक खात्याचे उदघाटन…

कोल्हापुर – राजेद्र ढाले

महावितरण,महापारेषण व महानिर्मीती या वीज कंपन्यातील रिक्त पदांवर हजारो वीज कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. कोरोणा काळात सुमारे 55 कंत्राटी कामगाराचा कर्तव्यावर असताना अपघाती मुत्यू झाला मात्र या कामगाराच्या वारसाला महावितरण कंपनी अथवा शासना कडुन कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही कामगाराच्या मुत्युनंतर त्याच्या कुटुंबाची मोठी आर्थिक हानी व हेळसाड होते याच व्यथेतुन महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघाने वेलफेअर फंड स्थापन करुन ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी तर्फे पेड विमा घेतला परन्तु तुटपुज्य वेतनात विम्यासाठी वार्षीक हप्ता भरणे देखील कामगाराना परवडत नसल्याचे संघटनेच्या लक्षात आले.

संघटनेने बँकिग क्षेत्रातिल अग्रगण्य नामवंत व सामाजिक भान असलेल्या HDFC या बँकेशी सहकार्य करार करुन महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेच्या सदस्याचे मोफत सँलरी बँक आकाऊंट काढण्याचे असुन संघटनेचे सदस्य असलेल्या कामगाराचा अपघात मुत्यू झाल्यास त्याच्या वारसाला रुपये 110000(आकरा लाख)मिळणार आहे
या योजनेमुळे राज्यातिल हजारो कामगाराना हे सँलरी आकाउंट व अन्य इतर अनेएक सुविधांचा लाभ अगदी मोफत मिळणार असुन या माध्यमातुन कामगाराण्या जिविताचा विमा निघुन त्यांच्या कुटुबियाना मोठी आर्थिक सुरक्षितता मिळणार आहे.

संघटने तर्फे कामगार हितार्थ राबवत असलेल्या स्तुत्य अशा उपक्रमाची सुरूवात महावितरण पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक अकुंश नाळे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी त्यानी कंत्राटी कामगार वैभव कागीलकर ,शेखर विध्वंक यांना प्रातिनिधिक स्वरुपात नविन वेतन बँक खाते देऊन शुभारंभ केला.यावेळी संघटनेचे केद्रीय अध्यक्ष निलेश खरात ,सरचिटणीस सचिन मेगांळे ,कार्यध्यक्ष उमेश आनेराव,सघंटन मंत्री राहुल बोडके तसेच HDFC बँकेचे मॅनेजर व सेल्स आॅफिसर उपस्थित होते. पुण्य प्रादेशिक अकुंश नाळे व पादाधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here