मनपा शाळा नंबर ११ चे आज महापौरांच्या हस्ते उद्घाटन, नगरसेवक योगेंद्र दादा थोरात यांनी शाळेचे केले नुतनीकरण…

सांगली – ज्योती मोरे

दि १७/११/२०२१ कनवाडकर हौद येथील महानगरपालिका शाळा नंबर ११ चे सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.२०१६ ला मनपा शाळा नंबर ११ ही बंद पडण्याच्या अवस्थेमध्ये होती. पण नगरसेवक योगेंद्र दादा थोरात यांनी पुढाकार घेऊन या शाळेला १० लाखांचा निधी मंजूर करुन या शाळेचे नुतनीकरण केले आहे.

सुसज्ज असे शाळेचे वर्ग,शाळेला स्टेज, सुसज्ज अशी इमारत,शाळेत मुलांना शिकण्यासाठी प्रोजेक्टर अशी सर्व सुविधा या शाळेमध्ये दिल्या आहेत.या शाळेचा पट ७० होता,पण नुतनीकरण झाल्यानंतर या शाळेचा पट १५० वर गेला आहे.

या शाळेत मुले हे ५ किमी वरुन येतात.कारण या शाळेमध्ये शिक्षक वर्ग चांगला आहे आणि शिक्षण ही छान आहे.पण यांच शाळेचे नुतनीकरण करुन नगरसेवक योगेंद्र दादा थोरात यांनी गरीब, कष्टकरी,दिनदुबळ्या नागरिकांच्या मुलांना दिलासा दिला आहे.

इंग्लिश शिकता यावे यासाठी या मनपा शाळा नंबर ११ मध्ये सेमी इंग्लिश चालू केले आहे.अशा या नुतनीकरण केलेल्या शाळेचे उद्घाटन आज सांगली,मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले.

यावेळी नगरसेवक योगेंद्र दादा थोरात,भाजपा युवा मोर्चा मिरज अध्यक्ष उमेश हारगे आजी माजी मुख्याध्यापक आणि शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थी-विद्यार्थीनी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी सर्व शिक्षक आणि शिक्षिका व मुख्याध्यापिका यांनी नगरसेवक योगेंद्र दादा थोरात यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here