मंत्री जोल्ले यांच्या हस्ते जलकुंभाचे उदघाटन…

प्रतिनिधी राहुल मेस्त्री..
कर्नाटक राज्याच्या महिला व बालविकास मंत्री नामदार शशिकला जोल्ले. निपाणी तालुक्यातील काही गावांचा दौरा करत असताना सुळगाव, मत्तीवडे आणि आडी या गावामध्ये लाखो रुपयाचा निधी मंजूर करून पिण्याच्या पाण्यासाठी बांधण्यात आलेल्या जलकुंभाचे उदघाटन कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मंत्री जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यांनी सुळगाव येथील कार्यकर्त्यांशी जनता दरबार प्रमाणे संवाद साधला .प्रारंभी उमेश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तर आनंदा पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आज जोल्ले वहिनी कॅबिनेट मंत्री असताना देखील छोट्या छोट्या वाड्यावर त्यांनी भेट देऊन तळागळातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून विकास कामे करत आहे. याचे मोजमाप कार्यकर्त्याने करणे गरजेचे आहे. यावेळी अशोक कांबळे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
पोर्णिमा पाटील आणि ज्योती विटे यांच्याहस्ते मंत्री महोदय यांचा सत्कार करण्यात आला. तर अंगणवाडी सेविकेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले बद्दल प्रमाणपत्र देऊन गीता पाटील यांचा सत्कार मंत्री जोल्ले यांनी केला .शेतीसाठी दोन टप्प्यात दररोज मिळणारी वीज एका टप्प्यात मिळावी.सुळगाव ते शंकरवाडी मार्गावर वृक्षारोपण करावे .आणि गावात विद्युत खांब बसवण्याची गरज असून ही समस्या मार्गी लावावी अशा प्रकारच्या मागण्या गावकऱ्यांनी केल्या .तर सदर मागण्या मार्गी लावण्यासाठी आणि विद्युत खांब तात्काळ बसवण्याचे आदेश मंत्र्यांनी हेस्काँम अधिकाऱ्यांना दिले.
सुळगाव मधील चार ग्रामपंचायत सदस्या सह आप्पाचीवाडी मंडल पंचायतीमध्ये आगामी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपचा झेंडा फडकवण्याचा निर्धार येथील कार्यकर्त्यांनी केला .तर मंत्री जोल्ले बोलताना म्हणाल्या की सध्या मंत्री पदामुळे पूर्ण राज्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आणि आपल्या मतदारसंघातील जनतेशी फार काळ संवाद साधता येत नाही .म्हणून आपण या ठिकाणी जनतेशी संवाद साधत आहोत. त्याच बरोबर निपाणी मतदार संघातील 26 ग्रामपंचायतींवर आगामी निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .
याप्रसंगी ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी ए एस बनगार, निपाणी ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक बी एस तळवार, ए एस आय संजू पाटील, पी एम घस्ती ,अमर चंदनशिव यांच्यासह सुळगाव ,मत्तीवडे आणि आडी येथील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here