जामनेर येथे ग्लोबल महाराष्ट्र मल्टीस्पेशालिटी व नर्सिंग कॉलेज चे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन…

बोदवड – गोपीचंद सुरवाडे

जामनेर जिल्हा जळगांव येथे मुंबई पुण्याच्या धर्तीवर सर्व प्रकारच्या सोईनी रुग्णांनासाठी अद्यावत असलेल्या ग्लोबल महाराष्ट्र व नर्सिंग कॉलेज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे उदघाटन महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन जामनेर हे होते,

ग्लोबल महाराष्ट्र व नर्सिंग कॉलेज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे जामनेर येथे मध्यवर्तीठिकाण असलेल्या बी ओ टी संकुलात उभारण्यात आले आहे, या हॉस्पिटलमध्ये किडनी रोपण,व हृदय प्रत्यर्पण सोडून सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सोई सुविधा उपलब्ध आहेत, वीस आय सी यु,बेड200 ओ टू, बेड तसेच टेली कॅन्सलटिंग द्वारे रुग्णांना तात्काळ उपचार उपल्ब्ध करून देणार आहेत,

या हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले, जन आरोग्य योजना,आयुष्यमान भारतयोजना विविध प्रकारच्या इन्शुरन्स कंपन्यांच्या योजनांचा लाभ तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या योजनांचे उपचार देखील करण्यात येतील असे कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरीश महाजन यांनी सांगितले,

याप्रसंगी माजी मंत्री सुभाष भामरे, रावेर लोकसभा खासदार रक्षाताई खडसे,जळगांव लोकसभा खासदार उन्मेष पाटील,माजी पालकमंत्री तथा आमदार संजय सावकारे भुसावळ, आमदारसुरेश भोळे जळगांव ,जळगावच्या महापौर भरती ताई सोनवणे,विधान परिषद आमदार स्मिता ताई वाघ,

जामनेरच्या नगर अध्यक्षा साधना ताई महाजन,मुक्ताईनगर नगराध्यक्ष नजिमा ताई तडवी,गोदावरी फाउंडेशन चे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ उल्हास दादा पाटील माजी आमदार गुरुमुख जगवणी,बुलढाण्याचे माजी आमदार विजयराज शिंदे,मलकापूर चे माजी आमदार चैनसुख संचेती,

लोकसंघर्ष मोर्चा च्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे सह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यक्रते यावेळी उपस्थित होते, ज्या एजन्सी व डॉ या हॉस्पिटलमध्ये सेवा देणार आहेत व ज्यांनी विशेष सहकार्य केले त्यांचा सत्कार करण्यात आला,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here