राहुल मेस्त्री
कोगनोळी तालुका निपाणी येथील नागरिकांना ओला व सुका कचरा टाकण्याची अडचण असेल किंवा जागा नसेल तर आता चिंता करण्याची गरज नाही. कारण कोगनोळी ग्रामपंचायतीमध्ये कोगनोळी गावातील विविध भागातील ओला व सुका कचरा उचलण्यासाठी घंटागाडीचा शुभारंभ करण्यात आला आहे.
दिनांक एक एप्रिल रोजी कोगनोळी ग्रामपंचायतीमध्ये माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज वीरकुमार पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व कोगनोळीच्या प्रथम नागरिक ग्रामपंचायत अध्यक्षा आक्काताई खोत व ग्रामपंचायत सदस्या मनीषा खोत यांच्या हस्ते पूजापाठ करून सदर घंटागाडीचे उद्घाटन करण्यात आले.

सुमारे सात लाख रुपये खर्च करून सदर घंटागाडी खरेदी करण्यात आली आहे अशी माहिती कोगनोळी ग्रामपंचायत पीडीओ डी बी जाधव यांनी दिली. तर कोगनोळी येथील नागरिकांनी आपल्या परिसरात कचरा न करता या घंटागाडीत कचरा टाकावा व आपला परिसर स्वच्छ ठेवावा असे अहवान माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी केले.
सदर घंटागाडीचे पूजापाठ झाल्यानंतर येथील ग्रामदैवत अंबिका मंदिरा शेजारी असणारा कचरा आप्पासाहेब खोत ग्रा.पं. सदस्य दिलीप पाटील, ग्रा.पं. सदस्य दादासो माणगावे यांनी घंटागाडी मध्ये कचरा टाकून सुरुवात केली.

या घंटागाडीच्या शुभारंभ प्रसंगी माजी तालुका पंचायत सदस्य बाळासो कागले, ग्रा.पं. सदस्य धनाजी पाटील ,ग्रा.पं. सदस्य युवराज कोळी, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पोवाडे, ग्रा.पं.सदस्य प्रवीण भोसले,ग्रा.पं.सदस्य महेश जाधव, संजय पाटील ,रामदास गाडेकर ,शिवाजी बेरड यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.