मनसर जिल्हा परिषद क्षेत्रात ई-श्रम कार्डचे थाटात उद्घाटन – जि.प. सदस्य सतिश डोंगरे यांचा लोकाभिमुख उपक्रम…

रामटेक – राजु कापसे

आज मनसर जिल्हा परिषद क्षेत्रातील मनसर येथील ग्रामपंचायत भवन येथे सतिश डोंगरे जिल्हा परिषद सदस्य यांच्या संकलपनेतून संपूर्ण जिल्हापरिषद क्षेत्रातील गावामधे ई श्रम कार्ड चे उद्घाटन श्री.अरविंदजी गजभिये (जिल्हा अध्यक्ष भाजपा) व श्री मल्लिकार्जुन रेड्डी (माजी आमदार) यांचा हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाला सरपंच सौ.योगेश्वरी चोखाद्रे, श्री.किशोर रेवतकर (जिल्हा महामंत्री भाजपा), श्री.ज्ञानेश्वर ढोक (जिल्हा महामंत्री आदिवासी आघाडी भाजपा), कपिल आदमने (जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाजपा), नंदकिशोर कोहळे (महामंत्री भाजपा रामटेक तालुका),

नंदकिशोर चंदणखेडे (तालुका अध्यक्ष बि.जे.वाय.एम. तथा ग्राम पंचायत सदस्य), धर्मेंद्र शुक्ला(महामंत्री बि.जे.वाय.एम. रामटेक तालुका), अश्विन कावळे, आकाश वानखेडे, राजू रामटेके (ग्राम पंचायत सदस्य), बैजू खरे, शशिकांत साहारे, पंकज मोहनकर आदी भाजपा कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here