ग्रामपंचायत कार्यालय, नगरधन येथील डिजिटल क्लासरूम चे उद्घाटन…

रामटेक – राजू कापसे            

नगरधन येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तयार करण्यात आलेल्या डिजिटल क्लासरुमचे उद्घाटन  मा. प्रशांतजी कामडी,सरपंच नगरधन यांच्या हस्ते करण्यात आले ग्रामपंचायत कार्यालय नगरधन तर्फे या डिजिटल क्लासरुमची संच यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळी नंदीवर्धन विद्यालय,नगरधन येथील प्राचार्य श्री.दीपक मोहोड सर मा. रामचंद्र दमाहे,सर मा.ए.जी.शेष मॅडम उपस्थित होते.

यावेळी बोलताना सरपंच मा. प्रशांतजी कामडी म्हणाले की,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे काम डिजिटल ग्रामपंचायत द्वारे होत आहे. गावातील विद्यार्थ्यांकरिता जास्तीत जास्त शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे ही संकल्पना मा, प्रशांत कामडी सरपंच, उपसरपंच ,सदस्य मा.पवन  उईके  ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत नगरधन यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा,

शिष्यवृत्ती परीक्षा या सारख्या स्पर्धा परीक्षांच्या सखोल व मनोरंजनात्मक ज्ञानासाठी उपलब्ध होत असून या सुविधेचा सर्व विद्यार्थ्यांना लाभ होईल. इतरही शैक्षणिक दृष्टिकोनातून सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मा. कामडी तसेच मा.उईके यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

सर्वप्रथम नंदीवर्धन विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.मोहोड, सर यांनी प्रास्ताविकामध्ये डिजिटल क्लासरूम उपलब्ध करून दिल्याबद्दल मा. प्रशांत कामडी सरपंच तसेच उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक अधिकारी पवन उईके साहेब यांच्या संकल्पनेला आम्ही सत्यात उतरवण्याचे कार्य विद्यालयाच्या वतीने करीत असल्याचे नमूद केले मा. रामचंद्र दमाहे,

सर यांनीही यावेळी मनोगत आणि आपल्या भविष्यकालीन संकल्पना मांडल्या.याप्रसंगी विद्यार्थी तसेच गावातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदीवर्धन विद्यालयाचे शिक्षक श्री. सुनील बारस्कर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. सिकंदर दमाहे,सर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here