शिरूर ताजबंद येथील मोहनराव पाटील आयुर्वेद रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी डी.सी.एच.सी सेंटरचे उद्घाटन…

अहमदपूर – बालाजी तोरणे

अहमदपुर – चाकुर या दोन्ही तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शिरूर ताजबंद येथील मोहनराव पाटील आयुर्वेद रुग्णालयाच्या सर्व पायाभूत भौतिक सुविधा व आवश्यक वैद्यकीय सोयीसुविधांनी युक्त इमारतीत 100 खाटांच्या(बेड)अद्यावत डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरचे आज महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव व आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटर मध्ये एकूण १० ० खाटाचे असुन त्यामध्ये ५० खाटा(बेड)हे ऑक्सिजन युक्त तर ५० बेड हे आयसोलेशन करिता करण्यात आले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरचा ग्रामीण भागातील कोरोनाग्रस्त रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे.

नैसर्गिक आपत्ती व त्यासोबतच हलाखीची परिस्थिती यामुळे गोरगरीब कुटुंबाला कोरोना या महामारीच्या आरोग्यविषयक समस्यांमुळे निर्माण झालेले आर्थिक संकट दूर करता यावे ही भूमिका घेऊन सदरील सेंटर सुरू करण्यासाठी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून करण्यात आला असून यासाठी धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,उदगीर येथील काही तज्ञ डॉक्टर्स व पॅरामेडिकल स्टाफ निरपेक्षपणे व निस्वार्थपणे शारीरिक व मानसिक दृष्ट्या ग्रस्त कोवीड रुग्णांवर उपचार करण्यासाठी उपलब्ध होणार असल्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजीमंत्री बाळासाहेब जाधव म्हणाले की, परिसरातील रुग्णांची अन्य विविध आरोग्यविषयक समस्यांसाठी सेवा आणि काळजी घेता यावी यासाठी अन्य आजारांच्या तपासणी व औषधोपचार करण्यासाठी बाह्यरुग्ण विभाग नियमित सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.

यावेळी उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, जि.प. चे गटनेते मंचकराव पाटील, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, गटविकास अधिकारी अंदेलवाड, महेश बँकेचे उपाध्यक्ष निवृत्ती कांबळे, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा मिनाक्षी शिंगडे, ग्रामीण रुग्णालय अहमदपूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दत्तात्रय बिरादार, संचालक सुरज पाटील,

धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,उदगीरचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय पाटील, सरपंच सावित्री पडोळे, प. स. सदस्या सुशििला भातीकरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल दासरे, डॉ. अमृत चिवडे, डॉ. राम यलगटे, डॉ. नरेंद्र हाके, डॉ. वैभव बिरादार, डॉ. गुरुराज वर्नाळे, तलाठी शाम कुलकर्णी, आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here