भिलेवाडा येथे संविधान उद्देशिका कोनशिलेचे लोकार्पण…

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य…संविधानाचे ज्ञान सर्व भारतीयांना अत्यावश्यकच…डॉ.सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त

रामटेक -: (ता.प्र.)

दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिनी संविधान साक्षरता अभियान, समारोप निमित्त भीलेवाडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे अंतर्गत समतादूत प्रकल्पाच्या वतीने ग्राम पंचायत भिलेवाडा येथे भारतीय संविधानाच्या कोनशिलेचे लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संविधान उद्देशिका कोनशिला जि.प.सदस्य संजय झाडे यांनी अभियानाचे महत्व लक्षात घेऊन गावास सप्रेम भेट दिली. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त डॉ सिद्धार्थ गायकवाड उपस्थित होते. त्यांनी संविधानाचे महत्व विशद केले. प्रमुख उपस्थिती प्रभारी प्रकल्प अधिकारी राष्ट्रपाल डोंगरे व पं.स.सदस्या मंगला सरोते यांची होती. संविधान कोनशिला निर्मिती व समारोह करीता सरपंच गोपीचंद खडसे व सचिव विद्यासागर कांबळे यांनी अथक परिश्रम घेतले.

याप्रसंगी कब्बडी, कुस्ती, क्रिकेट, चित्रकला, संगित खूर्ची इ.स्पर्धा विजेत्यांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमास जगदीश सांगोडे, पंकज बावनकर व राजू कापसे आदी पत्रकार तसेच उपसरपंच सुरेखा खडसे, सदस्यगण मनिषा खडसे, विद्या खडसे, संगीता चौधरी, गीता डोंगरे, अनिल डोंगरे, मुरलीधर मरस्कोल्हे व समतादूत राजेश राठोड, ओमप्रकाश डोले, दुर्योधन बगमारे, कविश्वर खडसे, प्रेमदास भोवते, सिंहाल भोवते, महिला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here