माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते सेंट्रल कृषक सेवा सहकारी संस्थेच्या अदासी व रतनारा येथिल आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

अदासी व रतनारा ( गोंदिया ) येथे सेंट्रल कृषक सेवा सहकारी संस्था द्वारा शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांचे उद्घाटन माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते संपन्न झाले. जैन यांच्यासह संचालक मंडळ व शेतकरी वर्ग यांच्या कडुन केंद्रावरील वजनांचे पुजन करुन धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. परिसरातील शेतकर्‍यांनी शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावर धान द्यावे असे आवाहन जैन यांनी केले.

खरीप हंगाम २०२१-२२ मधील धान खरेदी केंद्र त्वरीत सुरू करण्यात येईल व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप धानाची विक्री करण्यास कोणतीही अडचण होवू नये तसेच व्यापाऱ्यांना कमी भावात धान विकावा लागु नये यासाठी पटेल हे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यास प्रयत्नशील होते. खरीप हंगामातील धान खरेदी त्वरीत सुरु करण्यासाठी ते सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात होते याकरिता राज्याच्या संबंधित विभागाच्या मंत्र्यांसोबत बैठक घेऊन धान खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पटेल यांच्या प्रयत्नामुळे धान खरेदी सुरू झाल्याने शेतकर्‍यांनी प्रफुल पटेल यांचे आभार मानले.उद्घाटन प्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन, देवेंद्रनाथ चौबे, रमेश गौतम, नरेश डवरे, घनश्याम मस्करे, शंकर टेंभरे, रेखाताई चिखलोंढे, रामप्रसाद कंसरे, जितेश टेंभरे, नितीन टेंभरे, सतिश दमाहे, मदन चिखलोंढे, दिलीप अग्रवाल, सूखलाल बाहें, अशोक गौतम, तिलक पटले, धनपाल धुवारे, दुर्गाताई दमाहे, शैलेश वासनिक,

सुनील पटले, आरजु मेश्राम, कपिल बावनथडे, कुनाल बावनथडे, सिमाताई मोहाळे, भाऊलाल परतेती, तेजलाल नागपुरे, होमनदास पटले, सेवकपुरी वैकुंठी, पन्नालाल मचाडे, दिनेश तुरकर, आसाराम कसोडे, थानुलाल लिल्हारे, चैनलाल दमाहे, राजकुमार लिल्हारे, बलीराम बसेने, राजकुमार बसेने, शामु दमाहे, दुर्योधन भोयर, कौशल्याबाई डोंगरे, सहित मोठ्या संख्येने शेतकरी,पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here