पातूरच्या शेतकऱ्यांना आता रस्त्याची सोय उपलब्ध, आमदार नितीन देशमुख यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये उदघाटन…

पातुर – पातूर शहरातून नानासाहेब मंदिराच्या समोरून जाणारा रस्ता अतिशय जीर्ण आणि अपघात प्रवण होता. शेतकऱ्या करता डोकेदुखी ठरलेल्या रस्त्याचे अखेर भाग्य खुल् ले आणि तब्बल दहा वर्षानंतर या रस्त्याला सुगीचे दिवस आले असून बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शिर्ला ग्रामपंचायतच्या सरपंच सौ अर्चना सुधाकर शिंदे यांनी मंगळवारपासून बांधकामाला सुरुवात होणाऱ्या रस्त्याचे कुदळ मारून उद् घाटन केले.

यावेळी शिवसेनेचे पातुर शहर प्रमुख अजय ढोणे ,अरुण कचाले, दिलीप भाऊ बोचे, एडवोकेट सुरज झडपे ,गोपाल ढोरे ,माजी तालुकाप्रमुख गजानन शिंदे ,संदीप भाऊ सदार ,गोपाल ढोरे ,राजेश भगत, पातुर पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद देशमुख, डीगंबर खुरसडे ,सागर रामेकर, शिर्ला ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ कल्पना खर्डे, जनार्दन डाखोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

उद्घाटनाचे कार्यक्रमानंतर नानासाहेब मंदिरामध्ये एका छोटेखानी झालेल्या कार्यक्रमांमध्ये आमदार नितीन देशमुख यांनी मार्गदर्शन केले यामध्ये त्यांनी या उद्घाटनाप्रसंगी रस्त्याचे काम पूर्ण करणे माझे उद्दिष्ट असून आपण जनतेच्या भावना जोपासल्या हा मतदारसंघ मला कुटुंबा सारखा आहे या मतदारसंघातील कुठलीही समस्या सोडविण्याकरिता मी कटिबद्ध आहे.

स्वातंत्र्य काळानंतर मी लाभलेला पातुर तालुक्याला पहिला आमदार आहे त्यामुळे मी शेतकऱ्यांचा विश्वासाला तडा जाऊ देत नाही असे बोलताना पातुर चा हा रस्ता मंगळवारपासून बांधकामाला सुरू होईल अशी माहिती त्यांनी बोलताना दिली या कार्यक्रमात विरोधकांना उत्तर देताना त्यांनी मी कधीही जातिवाद केला.

नाही मी माणूस जोडण्याचे काम करीत असून सर्वसामान्यांच्या सेवेत कटिबद्ध असल्याचे ते बोलले याप्रसंगी पातुर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक गजानन पोपळघट आणि अकोट येथील दिलीप बोचे यांनीसुद्धा मार्गदर्शन केले या कार्यक्रमामध्ये संभाजी ब्रिगेडचे कैलास बगाडे, दिपक देवकर व त्यांचे मित्र परिवाराने शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे..

यावेळी पातुर नगरपरिषद चे माजी उपाध्यक्ष परसराम उंबरकर ,सुनील भाऊ गाडगे अंकुश बर्डे ,सचिन इंगळे, विजय देवकर , उमेश शिंदे ,अनिल निमकडे, अंबादास देवकर, परमानंद येंनकर ,फिरोज भाई, बंडूभाऊ देवकर, संजय काशीद ,प्रदीप काळपांडे, शीर्ला ग्रामपंचायतीचे सदस्य मंगल डोंगरे मोहन गाडगे यांच्यासह शाखाप्रमुख उपस्थित होते संचालन विश्वजीत इंगळे आणि आभार प्रदर्शन राहुल शेगोकार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here