शिवजयंतीच्या पर्वावर सरपंच, उपसरपंच पदग्रहण संपन्न…

बुलढाणा – अभिमान शिरसाट

चिखली तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघ असलेल्या सवणा ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचा ग्रामपंचायत भवनाथ कोवीड नियमांचे पालन करत छोटेखानी कार्यक्रमात शिवजयंतीच्या औचित्याने शिवरायांना वंदन करून पदग्रहणाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

या बाबत सविस्तर असे की, तेरा सदस्यसंख्या असलेली मोठी ग्रामपंचायत असलेले सवणा गाव चिखली तालुक्यातील राजकीय घडामोडीत गावचा नेहमीच खारीचा वाटा राहतोय. आणि आता या 13 सदस्य संख्या पैकी आठ महिला सदस्य व पाच पुरुष सदस्य या पाच पुरुष सदस्य मध्ये महिला वर्गाचे प्राबल्य आहे.

तेरापैकी आठ महिला सदस्य यामध्ये निवडून आल्या आहेत. आणि यामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून पहिल्यांदा बौद्ध समाजाची महिला सरपंचपदी विराजमान झाल्याने सर्व पुरोगामी विचाराच्या विचारधारा जोपासणाऱ्या गावकर्‍यांमध्ये आनंदाची लहर निर्माण झाली आहे.

गावच्या विकासाचा वाटा आता महिला वर्गाच्या हातात असून गावच्या नवनिर्वाचित सरपंच सौ. सत्यभामा समाधान सुरडकर तसेच उपसरपंच सौ. विद्या तुकाराम देवडे यांनी व सर्व नवनिर्वाचित सदस्य यांनी सर्व गावकऱ्यांच्या मूलभूत समस्या सोडूवुन सर्व गावची विकासाच्या दृष्टीने वाटचाल ठेवू असे आश्वासन दिले.

सदर पदग्रहणाचा कार्यक्रम तसेच शिवजयंतीचा कार्यक्रम – कोविड नियमांचे पालन करून सर्वांनी मास्क लावून संपन्न करण्यात आला. तसेच कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी शासनाने जारी केलेल्या नियमांचे सर्वांनी काटेकोर पालन करून शासन तथा ग्रामपंचायत प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच तथा ग्रामपंचायतचे सर्व नवनिर्वाचित सदस्य यांचे वतीने करण्यात आले.

सदर पदग्रहण तसेच शिवजयंतीच्या कार्यक्रमाला सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य मंडळी यामध्ये मालताबाई एखंडे ,रूक्‍मीनबाई सुरोशे, कल्पनाताई हाडे, उर्मिलाताई थोरात ,पार्वतीताई सोलाट, विठ्ठल देवडे ,रवींद्र सिरसाट, अनिरुद्ध भुतेकर, संगीताताई हाडे,

कयूम शाह, सतीश नवले तसेच गावचे माजी सरपंच आत्माराम भुतेकर तंटामुक्ती अध्यक्ष समाधान साजरे, गणेशभाऊ पाटील, पुरुषोत्तम हाडे, संजय जोशी, हरी गवारे, ज्ञानेश्वर साळोक, पत्रकार विजय भुतेकर सह गावातील सर्व समाजाचे प्रतिनिधी तसेच गावातील सर्व समाजाचे तोलामोलाचे कार्यकर्ते तथा पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here