यवतमाळ जिल्हयात ७९ कोरोनामुक्त, २२ पॉझेटिव्ह, दोन मृत्यू, जीएमसी, खाजगी व डीसीएचसीमध्ये एकूण २१०० बेड उपलब्ध…

यवतमाळ – सचिन येवले

यवतमाळ गत 24  तासात जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण जवळपास चारपट आहे. जिल्ह्यात 22 जण पॉझेटिव्ह तर 79 जण कोरोनामुक्त झाले असून आज दोन व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये शासकिय वैद्यकिय महाविद्यालयातील एक तर खाजगी रूग्णालयातील एका रूग्णाचा समावेश आहे.

जि.प.आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार बुधवारी   एकूण 3195 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 22 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 3173 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 669 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 251 तर गृह विलगीकरणात 418 रुग्ण आहेत.

तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72474 झाली आहे. 24 तासात 79 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 70024 आहे. आतापर्यत जिल्ह्यात एकूण 1781 मृत्युची नोंद आहे. जिल्हयात आतापर्यत 6 लक्ष 56 हजार 805 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 5 लक्ष 83 हजार 583 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 11.03 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 0.69 आहे  तर मृत्युदर 2.46 आहे.            

आज मृत्यू झालेल्या रूग्णांमध्ये शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ असलेल्या यवतमाळ शहरातील 62 वर्षीय महिला तर खाजगी रूणालयात उमरखेड येथील 55 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला आहे. पॉझेटिव्ह आलेल्या 22 जणांमध्ये 14 पुरुष आणि 8 महिला आहेत. यात दारव्हा येथील 2, दिग्रस येथील 2,कळंब 3,  महागाव येथील 4,  पुसद येथील 1, उमरखेड येथील 3,  वणी येथील 1, यवतमाळ येथील  5 तर झरीजामणी येथील 1 रुग्ण समावेश आहे.  

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2100 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 179 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2100 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 74 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 503 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 58 रुग्णांसाठी उपयोगात तर 468 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 47 उपयोगात तर 1129 बेड शिल्लक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here